ICC Nomination Player of the Month November 2025 : आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक विजेत्या भारतीय संघाची सदस्य असलेल्या सलामीवीर शफाली वर्माला आयसीसीच्या नोव्हेंबर महिन्याच्या ‘महिला प्लेयर ऑफ द मंथ’ साठी नामांकन मिळाले आहे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शफालीने नाबाद ८७ धावांची खेळी साकारली, तसेच २ महत्त्वपूर्ण विकेट्स घेत भारताला पहिल्यांदाच महिला विश्वचषक जिंकून दिला. या सामन्यात ती सामनावीर देखील ठरली होती. शफाली या खेळाडूंना मिळाले नामांकन – शफालीसोबत संयुक्त अरब अमिरातीची कर्णधार ईशा ओझा आणि थायलंडची फिरकीपटू थिपत्चा पुट्थावाँग यांनाही महिला गटातून नामांकन मिळाले आहे. बँकॉक येथे झालेल्या पहिल्या ‘आयसीसी महिला इमर्जिंग नेशन्स ट्रॉफी’मध्ये ईशा ओझाने ७ टी-२० सामन्यांत १८७ धावा (स्ट्राइक रेट १३७.५०) आणि ७ विकेट्स घेत ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’ पुरस्कार पटकावला. तर थिपत्चाने १५ विकेट्स घेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान मिळवले; अंतिम सामन्यात स्कॉटलंडविरुद्ध ४ विकेट्स घेऊन थायलंडला विजेतेपद मिळवून दिले. हेही वाचा – Sunil Narine : केकेआरसाठी IPL 2026 मध्ये ‘हा’ खेळाडू ठरु शकतो एक्स फॅक्टर ; सुनील नरेनचा दावा पुरुष गटातून कोणाला मिळाले नामांकन – दक्षिण आफ्रिकेचा ऑफस्पिनर सायमन हार्मर, बांगलादेशचा डावखुरा फिरकीपटू तैजुल इस्लाम आणि पाकिस्तानचा अष्टपैलू मोहम्मद नवाझ यांना पुरुष गटातून नोव्हेंबरच्या ‘प्लेयर ऑफ द मंथ’ साठी नामांकन मिळाले आहे. हार्मरने भारताविरुद्ध २५ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेला भारतात पहिली कसोटी मालिका (२-०) जिंकून मिळवून दिली. त्याने १७ विकेट्स घेतले (सरासरी ८.९४); दुसऱ्या कसोटीत ६/३७ अशा भेदक गोलंदाजीमुळे त्याला सामनावीर आणि मालिकावीर असे दोन्ही पुरस्कार मिळाले. हेही वाचा – IndiGo Crisis : इंडिगोच्या संकटामुळे BCCI ची धावपळ; SMAT चे नॉकआऊट सामने इंदूरहून पुण्यात हलवले! तैजुलने आयर्लंडविरुद्ध बांगलादेशच्या २-० कसोटी मालिका विजयात १३ विकेट्स घेऊन मालिकावीर पुरस्कार पटकावला. तर नवाझने श्रीलंका-झिम्बाब्वेविरुद्ध त्रिकोणी मालिकेत फलंदाजी व गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर चमक दाखवली. त्याने एकदिवसीय सामन्यामध्ये १०४ धावा, टी-२०मध्ये ११ विकेट्स आणि टी-२० अंतिम सामन्यात ३/१७ अशी कामगिरी करत मालिकावीर ठरला.