Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषद निवडणूक बिनविरोध! उद्या होणार अधिकृत घोषणा
Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक तर एका जागेची पोटनिवडणूक पार पडणार आहे.

Vidhan Parishad Election 2026 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक तर एका जागेची पोटनिवडणूक पार पडणार आहे.
भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. 12 मे रोजी सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. तर 12 मे रोजीच निकाल जाहीर होणार आहे.
विधान परिषदेच्या या निवडणुकीसाठी भाजपकडून 6, शिवसेनेकडून 2, राष्ट्रवादी काँग्रेसकडून 1 आणि मविआकडून 1 उमेदवारांचा अर्ज दाखल झाला आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठीची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं निश्चित झालं आहे.
चार अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद
कुठल्याही पक्षाने अकरावा उमेदवार न दिल्याने विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार आहे. तर चार अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद ठरले. या चार अपक्ष उमेदवारांचे अर्ज सूचक आणि अनुमोदक नसल्याने अवैध ठरले. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली असून विजयी उमेदवारांची घोषणा उद्या, सोमवारी करण्यात येईल.
अर्ज वैध ठरलेले उमेदवार
- भाजप : सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार, प्रज्ञा सातव
- शिवसेना शिंदे गट : डॉ. नीलम गोऱ्हे, बच्चू कडू
- राष्ट्रवादी अजित पवार गट : झिशान सिद्दिकी
- शिवसेना ठाकरे गट : अंबादास दानवे
दरम्यान, विधान परिषदेच्या एका जागेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या प्रज्ञा सातव यांचा अर्ज वैध ठरला आहे. या पोटनिवडणुकीसाठी एका अपक्ष उमेदवाराने अर्ज भरला होता. या अर्जावर सूचक आणि अनुमोदकाच्या सह्या नसल्याने तो बाद ठरला. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ४ मे आहे. ही मुदत संपल्यानंतर उद्या उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची घोषणा केली जाईल.
हेही वाचा:





