Vaibhav Sooryavanshi Reply : “गोलंदाजांपेक्षा मला ‘या’ गोष्टीची भीती वाटते…”; रवी शास्त्रींच्या गुगलीवर वैभव सूर्यवंशीच्या उत्तराने वेधलं लक्ष

Vaibhav Sooryavanshi Reply : आपल्या स्फोटक फलंदाजीने जगभरातील चाहत्यांची मनं जिंकणाऱ्या वैभवला यंदाच्या हंगामात ऑरेंज कॅपसह तब्बल पाच मोठे पुरस्कार मिळाले. त्याला 'स्पर्धेतील सर्वात मौल्यवान खेळाडू' म्हणूनही गौरविण्यात आले.

Updated On:
Vaibhav Sooryavanshi Reply : “गोलंदाजांपेक्षा मला ‘या’ गोष्टीची भीती वाटते…”; रवी शास्त्रींच्या गुगलीवर वैभव सूर्यवंशीच्या उत्तराने वेधलं लक्ष

Vaibhav Sooryavanshi Hilarious Reply To Ravi Shastri : आयपीएल २०२६ चा हंगाम संपला असला, तरी राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर वैभव सूर्यवंशीच्या नावाची चर्चा अजूनही थांबलेली नाही. आपल्या स्फोटक फलंदाजीने जगभरातील चाहत्यांची मनं जिंकणाऱ्या वैभवला यंदाच्या हंगामात ऑरेंज कॅपसह तब्बल पाच मोठे पुरस्कार मिळाले. त्याला ‘स्पर्धेतील सर्वात मौल्यवान खेळाडू’ म्हणूनही गौरविण्यात आले. अंतिम सामन्यानंतर झालेल्या बक्षीस वितरण सोहळ्यात प्रसिद्ध समालोचक रवी शास्त्री यांनी वैभवला एक मजेशीर प्रश्न विचारला, ज्यावर या छोट्या वंडर बॉयने दिलेल्या भन्नाट उत्तराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

रवी शास्त्रींच्या ‘त्या’ प्रश्नावर मैदानावर उडाला एकच कल्ला!

पुरस्कार स्वीकारल्यानंतर रवी शास्त्रींनी वैभवला विचारले, “तू मैदानावर गोलंदाजांची अशी धुलाई करतोस, एकापाठोपाठ एक गगनचुंबी षटकार मारतोस, मग तू रोज नक्की किती दूध पितोस?” शास्त्रींचा हा प्रश्न ऐकून वैभवला हसू अनावर झाले. त्याने हसत उत्तर दिले, “सर, सध्या तरी मी दूध पीत नाहीये!” वैभवचे हे उत्तर ऐकताच स्टेडियममधील ९० हजारांहून अधिक चाहत्यांनी एकच कल्ला केला आणि खुद्द रवी शास्त्रीही हसू लागले.

मुलाखतीबाबत बोलताना वैभव प्रामाणिकपणे म्हणाला, “इतके पुरस्कार मिळाल्यावर खूप छान वाटतंय. पण खरं सांगू तर, सध्या मी इथे मुलाखतीसाठी उभा आहे, त्यामुळे मला गोलंदाजांपेक्षा या मुलाखतीचंच जास्त दडपण येत आहे. तरीही हा माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे.”

ख्रिस गेलचा रेकॉर्ड मोडला; ऑरेंज कॅप जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू!

वैभव सूर्यवंशी आयपीएलच्या इतिहासात ऑरेंज कॅप जिंकणारा जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. त्याने या हंगामात १६ सामन्यांमध्ये ४८.५० च्या उत्कृष्ट सरासरीने तब्बल ७७६ धावा कुटल्या. यादरम्यान त्याने एक धडाकेबाज शतक झळकावले, तर तीन वेळा त्याचे ऐतिहासिक शतक अगदी थोडक्यात हुकले. विशेष म्हणजे, त्याने ‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेलचा एका मोसमात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही मोडीत काढला.

आपल्या फलंदाजीच्या शैलीबद्दल तो म्हणाला, “मी नेहमी माझ्या नैसर्गिक खेळावर आणि क्षमतेवर विश्वास ठेवतो. पहिलाच चेंडू जर माझ्या आवडीच्या टप्प्यात आला, तर मी पूर्ण आत्मविश्वासाने त्यावर फटका खेळतो.”

हेही वाचा – RCB Fans Violence : विजयाच्या नशेत RCB चे फॅन्स मर्यादा विसरले! थेट ॲम्ब्युलन्सवर डान्स ते बसवर दगडफेक, पाहा VIDEO

“दडपणात कसं खेळायचं ते शिकलो…”

यंदाच्या हंगामातील अनुभवाबाबत बोलताना वैभव म्हणाला, “या सीजनमध्ये मी दडपणाच्या परिस्थितीत कसं खेळायचं आणि सामन्याच्या गरजेनुसार स्वतःमध्ये कसा बदल करायचा, हे शिकलो आहे. प्रत्येक सामना एकाच मानसिकतेने खेळता येत नाही, परिस्थिती ओळखून संघाच्या गरजेनुसार खेळावं लागतं; विशेषतः प्ले-ऑफच्या सामन्यांमधून मला खूप काही शिकायला मिळालं.”

आणखी संबंधित बातम्या

RCB Fans Violence : विजयाच्या नशेत RCB चे फॅन्स मर्यादा विसरले! थेट ॲम्ब्युलन्सवर डान्स ते बसवर दगडफेक, पाहा VIDEO

2026-06-01 17:33:29

RCB Fans Violence : विजयाच्या नशेत RCB चे फॅन्स मर्यादा विसरले! थेट ॲम्ब्युलन्सवर डान्स ते बसवर दगडफेक, पाहा VIDEO

DK Shivakumar Statement : "आमच्यावर अन्याय झाला..."; RCB चॅम्पियन होताच मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार भडकले; आयोजकांवर केले आरोप

2026-06-01 16:14:15

DK Shivakumar Statement : "आमच्यावर अन्याय झाला..."; RCB चॅम्पियन होताच मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार भडकले; आयोजकांवर केले आरोप

Gujarat Titans bus : मोठी बातमी.! खेळाडूंनी भरलेल्या गुजरात टायटन्सच्या बसला आग; थोडक्यात वाचला जीव, नेमकं काय घडलं?

2026-06-01 09:42:20

Gujarat Titans bus : मोठी बातमी.! खेळाडूंनी भरलेल्या गुजरात टायटन्सच्या बसला आग; थोडक्यात वाचला जीव, नेमकं काय घडलं?

RCB vs GT Final : आरसीबीने सलग दुसऱ्यांदा IPL ट्रॉफीवर नाव कोरत रचला इतिहास! फायनलमध्ये गुजरात टायटन्सचा उडवला धुव्वा

2026-05-31 23:38:52

RCB vs GT Final : आरसीबीने सलग दुसऱ्यांदा IPL ट्रॉफीवर नाव कोरत रचला इतिहास! फायनलमध्ये गुजरात टायटन्सचा उडवला धुव्वा

Virat Kohli Celebration : फायनलमध्ये शुबमन गिल स्वस्तात बाद होताच विराट कोहलीचा एकच जल्लोष, आक्रमक सेलिब्रेशनचा VIDEO व्हायरल

2026-05-31 22:51:04

Virat Kohli Celebration : फायनलमध्ये शुबमन गिल स्वस्तात बाद होताच विराट कोहलीचा एकच जल्लोष, आक्रमक सेलिब्रेशनचा VIDEO व्हायरल