Rohini Khadse : “…भुर्दंड सामान्य जनतेला सहन करायचाच आहे”; पेट्रोल डिझेलच्या दरावाढीनंतर रोहिणी खडसेंकडून नाराजी व्यक्त
Rohini Khadse : येणाऱ्या काळात केंद्र सरकार पेट्रोल डिझेलच्या दरात असंच कलेकलेने दरवाढ करेल, असा दावाही रोहिणी खडसेंनी केला.

Rohini Khadse : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरुन केंद्र सरकारला खडेबोल सुनावले आहे. यापूर्वी 15 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता चार दिवसांतच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दुसऱ्यांदा वाढ झाली आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये आज, १९ मे पासून पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलचे दर 87 पैशांनी तर डिझेलचे दर 91 पैशांनी वाढल्याने रोहिणी खडसे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. येणाऱ्या काळात केंद्र सरकार पेट्रोल डिझेलच्या दरात असंच कलेकलेने दरवाढ करेल, असा दावाही त्यांनी केला आहे.
रोहिणी खडसेंचे ट्वीट (Rohini Khadse)
रोहिणी खडसे यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत लिहिले की, “मागच्या वेळी पेट्रोल डिझेलच्या भावात घसघशीत ३ रुपये वाढवले होते. त्यामुळे लोकांनी केंद्रात सत्तेवर बसलेल्या भाजपला गल्लीपासून दिल्लीपर्यंत झोडपून काढले होते. या गोष्टीतून धडा घेत आज पेट्रोलचे दर ८७ पैशांनी तर डिझेलचे दर ९१ पैशांनी वाढवलेले दिसत आहे. Rohini Khadse
मागच्या वेळी पेट्रोल डिझेलच्या भावात घसघशीत ३ रुपये वाढवले होते. त्यामुळे लोकांनी केंद्रात सत्तेवर बसलेल्या भाजपला गल्लीपासून दिल्लीपर्यंत झोडपून काढले होते. या गोष्टीतून धडा घेत आज पेट्रोलचे दर ८७ पैशांनी तर डिझेलचे दर ९१ पैशांनी वाढवलेले दिसत आहे.
आज देशाची जी परिस्थिती आहे,… https://t.co/pnXLk6Yh0l
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) May 19, 2026
आज देशाची जी परिस्थिती आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात केंद्र सरकार पेट्रोल डिझेलच्या दरात असंच कलेकलेने दरवाढ करेल असं दिसतंय. पण शेवटी काय ? पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचा भुर्दंड हा सामान्य जनतेला सहन करायचाच आहे… चाकू खरबूजे पर गिरे या खरबूजा चाकू पर, कटना तो खरबूजे को ही है !” असा खोचक टोला त्यांनी केंद्र सरकारला लगावला आहे. (Rohini Khadse)
दरम्यान, पेट्रोल-डिझेल महागल्यामुळे मालवाहतुकीचा खर्च वाढणार आहे. परिणामी येत्या काळात भाजीपाला, दूध आणि इतर जीवनावश्यक वस्तूही महागण्याची शक्यता असून, याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या बजेटवर होणार आहे. Rohini Khadse
हेही वाचा:





