Petrol-Diesel price hike: महागाईचा भडका अन् खिशाला फटका! पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चौथ्यांदा वाढ
Petrol-Diesel price hike: दिल्लीत पेट्रोलने अखेर १०० रुपयांचा टप्पा ओलांडला

Petrol-Diesel price hike: पेट्रोल आणि डिझेल पुन्हा महागले आहे. पेट्रोलच्या दरात 2.61 रुपयांनी आणि डिझेलच्या दरात 2.17 रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्या 10 दिवसांत इंधनाच्या दरात दरवाढ होण्याची ही चौथी वेळ आहे. आज, 25 मे रोजी सकाळी 6 वाजल्यापासून देशभरात इंधनाचे नवे दर लागू झाले आहेत.
या नव्या वाढीमुळे राजधानी दिल्लीत पेट्रोलने अखेर १०० रुपयांचा टप्पा ओलांडला असून ते १०२.१२ रुपये झाले आहे, तर डिझेल ९५.२० रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे. तर मुंबईत पेट्रोल 2.76 रूपये वाढून ते 111.21 रूपये प्रति लीटरवर पोहचले आहे. तर डिझेल 2. 81 रूपयांनी वाढून 97.83 रूपये प्रति लीटर झाले आहे. Petrol-Diesel price hike
याआधी मार्च 2024 मध्ये लोकसभा निवडणुकांपूर्वी पेट्रोल-डिझेल 2 रुपयांनी स्वस्त करण्यात आले होते. मात्र मे 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आगामी काळात इंधनाचा वापर जपून करण्याचे आवाहन केल्यानंतर सर्वात आधी 15 मे रोजी पेट्रोलच्या दरात 3 रुपये आणि डिझेलच्या दरात 3.11 रुपयांची वाढ करण्यात आली होती.
चौथ्यांदा मोठी वाढ
त्यानंतर चार दिवसांनी 20 मे रोजी पेट्रोलच्या दरात 86 पैसे आणि डिझेलच्या दरात 83 पैशांची दुसऱ्यांदा वाढ झाली. 23 मे 2026 रोजी शनिवारी सकाळपासून तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली. त्यानुसार पेट्रोलचा प्रतिलीटर दर 87 पैसे आणि डिझेलची प्रतिलीटर किंमत 91 पैशांनी वाढले आहेत.
आता पुन्हा एकदा अवघ्या 11 दिवसांत 4 वेळा किमती वाढवून सरकारने सर्वसामान्यांना मोठा झटका दिला आहे. एकूणच, गेल्या 11 दिवसांत पेट्रोल प्रति लिटर 7.35 रुपयांनी आणि डिझेल प्रति लिटर 7.53 रुपयांनी महाग झाले आहे.
दरम्यान, डिझेल महागल्यामुळे येत्या काही दिवसांत भाजीपाला, दूध आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक महाग होऊ शकते. ज्याची सुरुवात झाल्याचेही दिसत आहे. अलिकडेच दुधाच्या किंमतीत वाढ करण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा महागाईचा भडका उडून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे.
हेही वाचा:





