Team India Flight : टीम इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला! २६ मिनिटे हवेत घिरट्या अन् प्रचंड टर्ब्युलन्स; खेळाडूंनी सोडला सुटकेचा निश्वास, नेमकं काय घडलं?
Team India Flight Turbulence : टीम इंडियाच्या विमानाचा वेलिंग्टनमध्ये उतरण्याचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाला. विमान धावपट्टीच्या अगदी जवळ आले होते, परंतु जोरदार वाऱ्यामुळे वैमानिकाला ते परत वर न्यावे लागले.

Team India Flight Turbulence Wellington Landing Scare Shubman Gill KL Rahul NZ5817 : न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय कसोटी संघातील खेळाडूंना वेलिंगटन विमानतळावर उतरण्यापूर्वी एका अत्यंत थरारक आणि भीतीदायक अनुभवाचा सामना करावा लागला. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर वनडे संघ माउंट माउंगानुईकडे रवाना झाला, जिथे त्यांचे पारंपरिक ‘हाका’ नृत्याने स्वागत झाले. मात्र, कसोटी मालिकेच्या तयारीसाठी वेलिंगटनला निघालेल्या शुबमन गिल, केएल राहुल, अंशुल कंबोज आणि गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल यांच्यासह सपोर्ट स्टाफच्या विमानाला जोरदार वादळी वाऱ्याचा तडाखा बसला, ज्यामुळे पहिला लँडिंगचा प्रयत्न अयशस्वी ठरला.
फ्लाइट NZ5817 ने घेतले होते उड्डाण; विमानतळाजवळ जोरदार टर्ब्युलन्स
‘रेवस्पोर्ट्झ’च्या वृत्तानुसार, भारतीय कसोटी संघाचे ८ ते १० सदस्य एअर न्यूझीलंडच्या NZ5817 विमानाने स्थानिक वेळेनुसार सकाळी ११:४३ वाजता हॅमिल्टनहून वेलिंगटनसाठी रवाना झाले होते. सुरुवातीचा प्रवास अगदी सुरळीत होता; परंतु विमान वेलिंगटन विमानतळाजवळ पोहोचताच वाऱ्याचा वेग प्रचंड वाढला आणि विमानाला तीव्र क्रॉसविंड व टर्ब्युलन्सचा सामना करावा लागला. यामुळे विमानाचे संतुलन काही क्षणांसाठी बिघडले होते.
जगातील सर्वात कठीण विमानतळ; रनवेच्या काही फूट उंचीवरून विमान पुन्हा आकाशात
🚨A scary flight experience for members of the Indian cricket team travelling from Hamilton to Wellington. Strong winds and turbulence made the landing uncomfortable, with the aircraft having to go around before eventually touching down safely.
Captain Shubman Gill, vice captain KL Rahul, Anshul Kamboj and members of the support staff were on board the flight.
@rohitjuglan with details
@IDFCFIRSTBank
— RevSportz Global (@RevSportzGlobal) November 12, 2026
डोंगररांगांनी वेढलेले वेलिंगटन विमानतळ हे जगातील सर्वात आव्हानात्मक विमानतळांपैकी एक मानले जाते. दुपारी १२:४५ च्या सुमारास विमान धावपट्टीच्या अवघ्या काहीशे फूट उंचीवर असताना सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वैमानिकांना लँडिंग रद्द करावी लागली. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी वैमानिकांनी तत्काळ ‘गो-अराउंड’चा निर्णय घेत विमान पुन्हा ५,००० फुटांहून अधिक उंचीवर नेले.
२६ मिनिटांच्या थरारानंतर दुसऱ्या प्रयत्नात सुरक्षित लँडिंग –
Hamilton ✅
Travel day ✅
Hello, Tauranga 👋
#TeamIndia | #NZvIND https://t.co/hi1iDsmZxG
— BCCI (@BCCI) November 11, 2026
हवेत घिरट्या घातल्यानंतर वाऱ्याचा वेग किंचित मंदावताच वैमानिकांनी दुसऱ्यांदा लँडिंगचा प्रयत्न केला, ज्यात त्यांना यश आले. निर्धारित वेळेपेक्षा तब्बल २६ मिनिटे उशिराने, म्हणजेच दुपारी १:०६ वाजता विमान सुरक्षितरीत्या धावपट्टीवर उतरले. काही काळ खेळाडूंचा जीव अक्षरशः टांगणीला लागला होता; सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.
१९ नोव्हेंबरपासून बेसिन रिझर्व्हवर रंगणार पहिला कसोटी सामना –
सुरक्षित लँडिंगनंतर सर्व भारतीय खेळाडू आणि सपोर्ट स्टाफने सुटकेचा निश्वास सोडला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेला येत्या १९ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून, पहिला कसोटी सामना वेलिंगटनच्या ऐतिहासिक बेसिन रिझर्व्ह मैदानावर खेळवला जाईल.





