Uday Samant : “विवेकानंद पाटील यांचं घर बघून त्यांच्या संघर्षाची कल्पना येते, पण त्यापेक्षाही…”; उदय सामंत यांच्याकडून कौतुक
Uday Samant : विवेकानंद पाटील यांचे घर अतिशय साधे, पत्र्याचे आणि मातीच्या भिंतींचे आहे. त्यांचे आई-वडील शेती करतात.

Uday Samant : पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले असून, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाची राज्यभरात चर्चा आहे. या आंदोलनाच्या व्यासपीठावरून आपल्या खास कोल्हापुरी शैलीतील आक्रमक भाषणाने एका तरुणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा तरुण म्हणजे विवेकानंद मारुती पाटील.
अवघ्या २४ वर्षांच्या विवेकानंद पाटील यांच्या भाषणातील खास शैली आणि सरकारला थेट सवाल करण्याची पद्धत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील माजगाव हे विवेकानंद पाटील याचे मूळ गाव आहे.
सध्या त्याच्या गावाकडील घराचा व्हिडीओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्याचे घर अतिशय साधे, पत्र्याचे आणि मातीच्या भिंतींचे आहे. विवेकानंद पाटील यांच्या आई-वडील शेती करतात. त्याच्या याचे घराचा व्हिडिओ शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनीही शेअर केला आहे. तसेच विवेकानंद पाटील यांचे कौतुकही केले.
उदय सामंत यांची पोस्ट
उदय सामंत यांनी ट्वीट करत लिहिले, “सोशल मीडियावर आज एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विवेकानंद पाटील यांच्या घराचा व्हिडिओ दिसला. त्यांच्या घरात स्वामी विवेकानंद यांचा फोटो बघून आनंद झाला. स्वामी विवेकानंद म्हणायचे, “ज्ञान मिळवण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे ध्यान आणि एकाग्रता. एकाग्रतेच्या साहाय्यानेच विषयाच्या मूळ गाभ्यापर्यंत पोहोचता येते”, असं उदय सामंत म्हणाले.
सोशल मीडियावर आज एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विवेकानंद पाटील यांच्या घराचा व्हिडिओ दिसला. त्यांच्या घरात स्वामी विवेकानंद यांचा फोटो बघून आनंद झाला. स्वामी विवेकानंद म्हणायचे,” “ज्ञान मिळवण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे ध्यान आणि एकाग्रता. एकाग्रतेच्या साहाय्यानेच विषयाच्या मूळ गाभ्यापर्यंत पोहोचता येते.”
विवेकानंद पाटील यांचं घर बघून त्यांच्या संघर्षाची कल्पना येते. मात्र, त्यापेक्षाही त्यांच्या घरातील पारितोषिकांनी माझ्या मनाला अधिक समाधान दिलं… त्यामुळं एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या पाठिशी महाराष्ट्र शासन सदैव उभं आहे, एवढीच हमी यानिमित्तानं देतो…
#uadysamant #udaysamantsaheb #MPSC #mpscstudents #MaharashtraStudents #CompetitiveExams #StudentMotivation #Inspiration #SwamiVivekananda #YouthPower #EducationForAll #MaharashtraGovernment
— Uday Samant (@samant_uday) October 6, 2026
पुढे त्यांनी लिहिले, “विवेकानंद पाटील यांचं घर बघून त्यांच्या संघर्षाची कल्पना येते. मात्र, त्यापेक्षाही त्यांच्या घरातील पारितोषिकांनी माझ्या मनाला अधिक समाधान दिलं, असं म्हणत उदय सामंत यांनी विवेकानंद पाटील यांचं कौतुकही केलं. तसेच एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या पाठिशी महाराष्ट्र शासन सदैव उभं आहे, एवढीच हमी यानिमित्तानं देतो,” असेही उदय सामंत म्हणाले.
विश्वजीत कदम यांची ऑफर नम्रपणे नाकारली
दरम्यान, काँग्रेस नेते विश्वजीत कदम देखील पुण्यातील MPSC विद्यार्थांच्या आंदोलनात रोहित पवार यांच्यासोबत पाहायला मिळतात. यावेळी विश्वजीत कदम यांनी विवेकानंद पाटील यांना चांगले घर बांधून देण्याची ऑफरही दिली होती. परंतु विवेकानंद पाटील यांनी विश्वजीत कदम यांची ही घर बांधून देण्याची ऑफर नम्रपणे नाकारली. ‘मी तरुण आहे आणि माझ्यात काम करण्याची धमक असल्याने परिस्थितीचा फायदा घेऊ इच्छित नाही, अशी भूमिका विवेकानंद पाटील यांनी मांडली. त्यांच्या या गोष्टीचे देखील अनेकांकडून कौतुक करण्यात आले.
हेही वाचा:





