Sachin Tendulkar Video : ‘हेल्मेट नाहीये का? गाडी सावकाश चालव…’, पुण्यातील रोडवर तरुणाला भेटला ‘क्रिकेट’चा देव, पाहा VIDEO
Sachin Tendulkar Video : 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकरने रस्त्यात थांबवून सुरक्षेचा मोलाचा सल्ला दिला, ज्याचा व्हिडीओ आता व्हायर होत आहे.

Sachin Tendulkar Pune Viral Video : ‘पुणे तिथं काय उणे’ असं म्हटलं जातं, पण याच पुण्याच्या रस्त्यांवर कधी कोणाचं नशीब उजळेल हे सांगता येत नाही. पुण्यातील टिळक रोडवर नुकताच एक असा अविस्मरणीय क्षण पाहायला मिळाला, ज्याची चर्चा आता संपूर्ण सोशल मीडियावर रंगली आहे. विनाहेल्मेट फिरणाऱ्या एका पुणेकर तरुणाला साक्षात ‘क्रिकेटचा देव’ सचिन तेंडुलकरने रस्त्यात थांबवून सुरक्षेचा मोलाचा सल्ला दिला, ज्याचा व्हिडीओ आता व्हायर होत आहे.
नेमकं काय घडलं? (Sachin Tendulkar Video)
सोहम मरगजे नावाचा एक तरुण आपल्या दुचाकीवरून फेरफटका मारायला निघाला होता. डोक्यावर हेल्मेट नाही की उन्हापासून वाचण्यासाठी टोपी, अशाच अवतारात तो टिळक रोडवरील एस.पी. कॉलेज चौकात पोहोचला. सिग्नल लाल असल्याने सर्व वाहतूक थांबलेली होती. सोहमच्या बाजूला एक आलिशान ‘रेंज रोव्हर’ गाडी येऊन उभी राहिली. अचानक त्या गाडीची काच खाली झाली आणि आतून आवाज आला, “पोरा, हेल्मेट कुठंय?”
समोर सचिनला पाहून सोहम झाला चकित – (Sachin Tendulkar Video)
Sachin Tendulkar Pune Tilak Road Video : पोरा हेलमेट कुठंय… सोहमला वाटतं कोणतंही असेल… म्हणून त्यानं हळूच मागे वळून पाहिलं तर रेंज रोव्हर गाडीची काच खाली येत होती अन् आतमध्ये होता चक्क क्रिकेटचा देव…! pic.twitter.com/pimkSV7PzM
— News18 Marathi (@News18_marathi) May 9, 2026
कोणीतरी अनोळखी व्यक्ती विचारत असावी म्हणून सोहमने सहज मागे वळून पाहिले, तर समोरचे दृश्य पाहून त्याचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. गाडीच्या आत चक्क मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर बसला होता. कोणताही स्टारडमचा आविर्भाव न आणता, सचिनने अतिशय प्रेमाने सोहमला विचारले, “हेल्मेट नाहीये का? गाडी सावकाश चालव.” साक्षात सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आपल्याला सुरक्षेचा सल्ला देत आहे, हे पाहून सोहम काही क्षण पूर्णपणे सुन्न झाला. ( Sachin Tendulkar Video )
सेल्फी अन् व्हिडीओ तुफान व्हायरल – (Sachin Tendulkar Video)
आपल्या आयुष्यातील हा सर्वात मोठा आणि मौल्यवान क्षण असल्याचे लक्षात येताच सोहमने त्वरित आपला फोन काढला. सचिनने देखील मोठ्या मनाने सोहमच्या उत्साहाला दाद दिली आणि त्याच्या सेल्फीला पोझ दिली. एवढेच नाही तर व्हिडिओमध्ये सचिन त्याला हसून ‘हाय’ करतानाही दिसत आहे. नियमांचे पालन करण्याचे आवाहन करणाऱ्या सचिनचा हा साधेपणा नेटकऱ्यांना प्रचंड भावला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, “देव पावला” अशीच भावना सोहम आणि त्याचे चाहते व्यक्त करत आहेत.





