HSC Result 2026 : आज निकाल जाहीर होणार ; कधी आणि कुठे पाहाल? असे डाउनलोड करा मार्कशीट, जाणून घ्या सविस्तर…
HSC Result 2026 : गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून प्रतिक्षा असलेल्या बारावीचा निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे.

HSC Result 2026 : गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागलेले होते. अखेर आज 2 मे रोजी दुपारी 1 वाजता बारावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी बारावी (HSC) परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. त्याआधी सकाळी 11 वाजता पुणे येथील बोर्डाच्या कार्यालयात पत्रकार परिषद होणार असून, त्यामध्ये निकालाबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
विद्यार्थ्यांना त्यांचा वैयक्तिक निकाल आणि विषयनिहाय गुण दुपारी 1 वाजल्यानंतर ऑनलाईन पाहता येतील. त्यामुळे अवघ्या काही तासांवर निकाल लागणार असल्याने विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे.
यंदा सुमारे 14 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यामुळे यंदाही निकालात मुलीच बाजी मारणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांची ऑनलाईन गुणपत्रिका डाउनलोड करता येणार असून, ती पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
या अधिकृत संकेतस्थळांवर निकाल पाहू शकता. (HSC Result 2026)
mahresult.nic.in
mahahsscboard.in
hscresult.mkcl.org
results.digilocker.gov.in
हा निकाल अॅानलाईन असल्याने ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांबाबत शंका वाटत असेल, त्यांच्यासाठी गुणपडताळणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 3 मे ते 17 मे 2026 या कालावधीत विद्यार्थी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

HSC Result 2026 : आज निकाल जाहीर होणार ; कधी आणि कुठे पाहाल? असे डाउनलोड करा मार्कशीट, जाणून घ्या सविस्तर…
पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्यापूर्वी उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत घेणे अनिवार्य आहे. ही प्रत मिळाल्यानंतर 5 दिवसांच्या आत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करावा लागेल. यासाठीचे शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI किंवा नेट बँकिंगद्वारे भरता येईल.
विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ गुणपत्रिका काही दिवसांनंतर संबंधित कनिष्ठ महाविद्यालयातून मिळतील. तसेच DigiLocker ॲपवरही डिजिटल गुणपत्रिका सुरक्षित ठेवण्याची सुविधा उपलब्ध आहे.
बारावी (HSC) निकालानंतर गुणपत्रिका (Marksheet) ऑनलाईन डाऊनलोड करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. ती नेमकी कशी ते जाणून घ्या…
गुणपत्रिका डाऊनलोड करण्याची पद्धत
अधिकृत वेबसाईटला भेट द्या
खालीलपैकी कोणतीही वेबसाईट उघडा:
mahresult.nic.in
mahahsscboard.in
hscresult.mkcl.org
“HSC Result 2026” लिंकवर क्लिक करा.
होमपेजवर तुम्हाला “HSC Examination Result 2026” अशी लिंक दिसेल – त्यावर क्लिक करा.
आवश्यक माहिती भरा.
तुमचा Seat Number (आसन क्रमांक)
आईचे नाव (Mother’s Name)
“View Result” / “Submit” वर क्लिक करा.
तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
गुणपत्रिका डाऊनलोड करा.
“Download” किंवा “Print” पर्याय निवडा.
PDF स्वरूपात सेव्ह करा किंवा प्रिंट काढा.
तुम्ही DigiLocker ॲप वापरूनही डिजिटल मार्कशीट मिळवू शकता.
DigiLocker ॲप डाउनलोड करून ओपन करा.
मोबाईल नंबरने लॉगिंन करा.
“Education” किंवा “Issued Documents” मध्ये जा.
“Maharashtra Board HSC Marksheet” निवडा.
तुमची माहिती भरून डॉक्युमेंट डाउनलोड करा.
हेही वाचा : दिल्ली कॅपिटल्सचा ऐतिहासिक विजय! राहुल-निसांकाच्या वादळी खेळीपुढे राजस्थानचे गोलंदाज निष्प्रभ





