Rahul Gandhi : राहुल गांधी गोकुळसाठी मैदानात! “…शेतकरी हे विसरणार नाही” म्हणत भाजपला सुनावले
Rahul Gandhi : 'ही दूध उत्पादकांच्या मतांची चोरी, जनादेशात भेसळ आहे'

Rahul Gandhi : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळमध्ये महायुतीचा दारुण पराभव होऊनही फडणवीस सरकारने शासन नियुक्त संचालक घुसवून बहुमतावर कब्जा केला आहे.
यानंतर आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सुद्धा गोकुळसाठी मैदानात उतरले आहेत. त्यांनी ट्विट करत मतचोरांनो शेतकरी विसरत नाही म्हणत भाजपवर सडकून प्रहार केला आहे.
या पोस्टमध्ये राहुल गांधींनी भारतीय जनता पक्षाला लक्ष्य केलं असून निवडणूक निकालांनंतर संघ रचनेबाबत नियम बदलून भाजपानं जनादेशात भेसळ केल्याची टीका केली आहे. काँग्रेस नेते पवन खेरा यांनी यासंदर्भात केलेली एक पोस्ट राहुल गांधींनी रीट्वीट करून त्यावर आपली भूमिका मांडली आहे.
गोकुल में दूध उत्पादकों ने भाजपा को हरा दिया।
तो भाजपा ने चुनाव के बाद नियम बदल दिए – 4 डायरेक्टर ठूँसो, 12 को 16 बनाओ, बहुमत चुराओ। ये दूध उत्पादकों के वोट की चोरी है – जनादेश में मिलावट।
भाजपा इतनी हताश हो चुकी है कि हर जगह सत्ता बचाने के लिए किसी भी हद तक जा रही है।
दूध उत्पादकों का वोट चुराने वाले याद रखें – किसान भूलता नहीं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 5, 2026
राहुल गांधींची पोस्ट –
राहुल गांधींनी आपल्या पोस्टमध्ये भाजपा हताश झाली असल्याचं म्हटलं आहे. “गोकुळमध्ये दूध उत्पादकांनी भाजपाला हरवलं. तर भाजपानं निवडणुकीनंतर नियम बदलून टाकले. ४ संचालकांना घुसवा, १२ चे १६ करा, बहुमत चोरा. ही दूध उत्पादकांच्या मतांची चोरी आहे. जनादेशात भेसळ आहे.
भाजप इतकी हतबल झाली आहे की प्रत्येक ठिकाणी सत्ता वाचवण्यासाठी कुठल्याही थराला जात आहे. दूध उत्पादकांच्या मतांची चोरी करणाऱ्यांनी लक्षात ठेवावं, शेतकरी हे विसरणार नाही”, असं राहुल गांधींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
सतेज पाटील यांची प्रतिक्रिया
गोकुळ निवडणुकीत महायुतीला धोबीपछाड देणारे सतेज पाटील यांनी राहुल गांधींच्या या पोस्टवर आभार व्यक्त करणारी पोस्ट केली आहे. “धन्यवाद राहुलजी. कोल्हापूरच्या साडेपाच लाख दूध उत्पादकांचा आवाज बनण्यासाठी. गोकुळचा जनादेश शेतकऱ्यांचा आहे. आम्ही कोर्टातही लढू आणि रस्त्यावरही लढू”, असं सतेज पाटीलल यांनी राहुल गांधींची पोस्ट रीपोस्ट करताना म्हटलं आहे.
Jailer 2 OTT : रजनीकांतचा ‘जेलर २’ आता ओटीटीवर पाहता येणार; तारीख जाहीर





