Pune News : पुण्यात लाठीमाराचा तीव्र निषेध! संवेदना आहेत की नाही? आंदोलकांचा पोलिसांना सवाल
Pune News : नसरापूर अत्याचार प्रकरणातील आंदोलकांवर नवले पुलावर झालेल्या लाठीमाराचा पुण्यात निषेध होत आहे.

Pune News : नसरापूर अत्याचार प्रकरणी वीर बाजी पासलकर पूल ते नवले पुलादरम्यान शनिवारी झालेल्या आंदोलनामुळे निर्माण झालेली कोंडी फुटत नसल्याने पाच तासांनंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. लाठीमाराच्या घटनेचा नागरिकांनी निषेध केला आहे. (Pune News)
ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष (पुणे) आनंद दवे म्हणाले, पोलिसांशी चर्चा सुरु असताना शेवटच्या दहा मिनिटांत लाठीमार केला. जमाव हिंसक झाला नव्हता, तसेच कोणतीही अनुचित घटना घडली नव्हती. यामुळे लाठीमार करण्याची गरज नव्हती. (Pune News)
नसरापूर अत्याचार प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षा द्या, अन्यथा जमावाच्या ताब्यात द्या, या मागणीसाठी शनिवारी सायंकाळी नागरिकांनी चार तास रस्ता रोखून आपल्या भावना व्यक्त केल्या. चिमुकलीचा मृतदेह असलेल्या रुग्णवाहिकेसमोर तिचे आई-वडील आणि नागरिकांनी ठिय्या दिला. घटनास्थळी पिडीतेचे आई-वडिल, नातेवाईक ,नसरापूरचे ग्रामस्थ आणि स्थानिक नागरिकांनी तब्बल पाच तास महामार्ग अडवून धरला. (Pune News)
घटनास्थळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार दाखल झाल्यावर त्यांनी पालकांशी संवाद साधला. यानंतर पालक रुग्णवाहिकेतून मृतदेह वैकुंठ येथे अत्यसंस्कारासाठी घेऊन गेले. यानंतरही नागरिकांनी महामार्ग खुला केला नाही. (Pune News)
दुसरीकडे वाहनचालक पाच तास महामार्गावर अडकले होते. वाहनांच्या रांगा बालेवाडपर्यंत लागल्या होत्या. अनेकांसोबत लाहन मुले, ज्येष्ठ नागरिक होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसानी साडे दहाच्या सुमारास लाठीमार करुन नागरिकांना महामार्गावरुन हटवले. (Pune News)
अश्रृ अनावर
अनेकांनी लाठ्या खाल्ल्या. तुम्ही मारा, तुम्हाला संवेदना आहेत की नाही, असा प्रतिप्रश्न नागरिकांनी केला. अनेकांना अश्रृ अनावर झाले होते. लाठ्या खाल्ल्यानंतरही ते हटायला तयार नव्हते. रस्ता खुला करण्यासाठी पोलिसांसमोर दुसरा पर्याय नव्हता. दुसरीकडे पोलिसांवर समाजमाध्यमातून लाठीमाराबद्दल टीका करण्यात आली. यामध्ये काही राजकीय नेत्यांचाही समावेश होता. (Pune News)





