Sunil Tatkare : “विकृत मनोवृत्तीच्या लोकांना ठेचून फाशीची शिक्षा द्यावी”; अशोक खरात प्रकरणावर तटकरेंची प्रतिक्रिया
Sunil Tatkare : खरात असो कोणीही असो विकृत मनोवृत्तीच्या लोकांना ठेचून फाशीची शिक्षा द्यावी - सुनील तटकरे

Sunil Tatkare : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातबाबत सातत्याने नवनवीन माहिती समोर येत आहे. अनेक महिलांवर खरातने अत्याचार केल्याने अनेकांकडून याप्रकरणी संताप व्यक्त केला जात आहे. आता अशोक खरात प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कठोर भूमिका घेतली आहे.
सुनील तटकरे यांनी, भोंदू अशोक खरातला फाशी दिली पाहिजे. खरात असो कोणीही असो विकृत मनोवृत्तीच्या लोकांना ठेचून फाशीची शिक्षा द्यावी, हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवावे, अशी मागणी केली आहे.
सोलापूरमध्ये तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आले असताना माध्यमांशी संवाद साधताना सुनील तटकरे आले होते. त्यावेळी ते माध्यमांशी संवाद साधताना, “भोंदू अशोक खरात प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी राज्य सरकारने एसआयटी नेमावी आणि जलद गतीने तपास पूर्ण करावा. तसेच या प्रकरणात ज्यांचा ज्यांचा संबंध आढळेल, त्या सर्वांवर कठोर कारवाई करण्यात यावी,” असेही स्पष्ट केले आहे.
‘अपघाताच्या प्राथमिक अहवालाबाबत आम्ही समाधानी नाही’
जय पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल केलेल्या विधानावर देखील सुनिल तटकरे यांनी भाष्य केले आहे. “अजित पवारांच्या अपघाताच्या प्राथमिक अहवालाबाबत आम्ही समाधानी नाही. जय पवार अगोदरच पत्रकार परिषद घेणार होते. त्यांनी बारामतीलाच खुलासा केला आहे. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.” असे तटकरे म्हणालेत.
हेही वाचा:






