Pakistan Shameful Record : पाकिस्तान क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस! १४० वर्षांत इंग्लंडमध्ये जे घडले नाही ते घडले
Pakistan Shameful Record : इंग्लंडमध्ये पाकिस्तानच्या नावावर कसोटी क्रिकेटमधील एक अत्यंत लाजिरवाणा जागतिक विक्रम नोंदवला गेला आहे.

Pakistan Cricket Team Shameful Record Top 5 Batsmen Out On Single Digit Edgbaston Test : इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात एजबॅस्टनच्या मैदानावर सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानच्या फलंदाजांची भंबेरी उडाली आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानच्या नावावर कसोटी क्रिकेटमधील एक अत्यंत लाजिरवाणा जागतिक विक्रम नोंदवला गेला आहे. इंग्लंडच्या धरतीवर १४० वर्षांहून अधिक काळाच्या कसोटी इतिहासात पहिल्या डावात पहिल्यांदाच एका संघाचे अव्वल ७ फलंदाज दुहेरी आकडाही न गाठता (सिंगल डिजिटवर) तंबूत परतले.
पहिल्याच सत्रात अवघ्या २३ षटकांत १०० वर ७ बाद; इंग्लिश माऱ्यासमोर उडाली दाणादाण!
सामन्याच्या पहिल्याच सत्रात यजमान इंग्लंडच्या वेगवान माऱ्याने पाकिस्तानच्या फलंदाजीला सुरुंग लावला. पाकिस्तानने अवघ्या २३ षटकांत १०० धावांच्या आत आपले ७ फलंदाज गमावले. सलामीवीर सैम अयुब भोपळाही न फोडता ऑली रॉबिन्सनच्या गोलंदाजीवर पायचित झाला. त्यानंतर अझान अवैस ९ धावांवर जोफ्रा आर्चरचा बळी ठरला. अब्दुल्ला शफिक अवघ्या ३ धावा काढून रॉबिन्सनचा शिकार बनला, तर कर्णधार शान मसूद ५ धावांवर आर्चरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. अनुभवी बाबर आझम १८ चेंडूंत केवळ ७ धावा करून जोश टंगच्या अप्रतिम इन-कटरवर त्रिफळाचीत झाला.
जोश टंग आणि आर्चरचे वादळ; इंग्लंडच्या पेस अटॅकचा घातक मारा!
🚨 PAKISTAN MATCH THEIR 72-YEAR-OLD RECORD! 🤯🇵🇰
Pakistan have failed to reach 200 in five consecutive Test innings for only the second time in their history, equalling their previous record set in 1954-55.
A historic batting slump. 😳#PAKvENG #TestCricket #PakistanCricket pic.twitter.com/6E4geYW7gM
— Ha55an Tufail (@HassanTufaill) September 9, 2026
इंग्लंडने नाणेफेक जिंकून खेळपट्टीवरील ओलाव्याचा आणि स्विंगचा पुरेपूर फायदा उठवला. युवा वेगवान गोलंदाज जोश टंगने पहिल्या सत्रात अचूक मारा करत बाबर आझमसह पदार्पण करणारा यष्टिरक्षक गाझी घोरी आणि मोहम्मद इमरान यांना बाद करून पाकिस्तानची कंबर मोडली. ऑली रॉबिन्सन आणि जोफ्रा आर्चर यांनी सुरुवातीपासूनच फलंदाजांना मोकळा श्वास घेऊ दिला नाही, ज्यामुळे पाकिस्तानचा निम्मा संघ अवघ्या २५ धावांच्या आत गारद झाला होता. विशेष संपूर्ण संघ १३३ धावांत गारद झाला आणि फक्त तीन खेळाडूंना दुहेरी आकडा गाठता आला,.
अहमद शहजादचा घणाघात; ‘घाबरट वृत्तीमुळेच पाकिस्तानची नाचक्की!’
या सुमार कामगिरीनंतर जगभरातून पाकिस्तानी संघावर टीकेचा भडिमार होत असून चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. पाकिस्तानचा माजी सलामीवीर अहमद शहजादने संघाच्या मानसिकतेवर थेट बोट ठेवले. सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करताना शहजादने लिहिले की, “चांगल्या फलंदाजीच्या खेळपट्टीवरही पाकिस्तानच्या अव्वल फळीने पुन्हा एकदा अत्यंत घाबरट वृत्तीचे प्रदर्शन केले.” या लाजिरवाण्या कामगिरीमुळे पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममधील गोंधळ पुन्हा एकदा उघडा पडला आहे.





