MS Dhoni Injury : एमएस धोनी १६ एप्रिलला मोठा निर्णय घेणार! चेन्नई सुपर किंग्सच्या गोटात चिंतेचे वातावरण, नेमकं कारण काय?
MS Dhoni Injury : एमएस धोनीच्या फिटनेसबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, १६ एप्रिलला तो आपल्या सहभागाबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

MS Dhoni Injury Update IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या रणधुमाळीत चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि त्यांच्या कोट्यवधी चाहत्यांसाठी एक धाकधूक वाढवणारी बातमी समोर येत आहे. संघाचा ‘थाला’ म्हणजेच महेंद्रसिंग धोनी याच्या फिटनेसबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, १६ एप्रिलला तो आपल्या सहभागाबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
आयपीएल २०२६ चा हंगाम निर्णायक वळणावर असतानाच चेन्नई सुपर किंग्सचा सर्वात मोठा आधारस्तंभ महेंद्रसिंग धोनी याच्या दुखापतीने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. गेल्या काही सामन्यांपासून धोनी आपल्या जुन्या गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त असल्याचे दिसून येत आहे. मैदानावर हालचाल करताना किंवा धावताना तो लंगडताना अनेकदा कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे आता धोनीच्या फिटनेसवर वैद्यकीय पथकाने लक्ष केंद्रित केले आहे.
१६ एप्रिलचा मुहूर्त ठरणार निर्णायक –
MS Dhoni will decide tomorrow morning on travelling to Hyderabad for the SRH clash a decision that could shape the game before it even begins.⏳
.
.#MSDhoni #CSK #ChennaiSuperKings #SRHvsCSK #IPL2026 #Dhoni #CaptainCool #BreakingNews #MatchUpdate #CricketNews #IndianCricket pic.twitter.com/aaja4LwwAX
— cricketfastliveline (@cfll_official) April 15, 2026
चेन्नईचा आगामी सामना हैदराबादमध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे. या महत्त्वपूर्ण सामन्यासाठी संघ रवाना होण्यापूर्वी, म्हणजे १६ एप्रिलला धोनी स्वतःच्या फिटनेसचा अंतिम आढावा घेणार आहे. जर दुखापत गंभीर असेल किंवा प्रवासात त्रास होणार असेल, तर धोनी हैदराबादला न जाता चेन्नईतच थांबून रिकव्हरीवर भर देण्याचा निर्णय घेऊ शकतो.
हैदराबादच्या चाहत्यांची धाकधूक वाढली –
धोनी सध्या फलंदाजीसाठी खालच्या क्रमांकावर येत असून आपल्या स्फोटक फटकेबाजीने चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. मात्र, २० षटके विकेटकीपिंग करणे त्याला जड जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. जर धोनी या सामन्याला मुकला, तर चेन्नईला केवळ फलंदाजीच्या रणनीतीतच नव्हे, तर नेतृत्वाच्या मार्गदर्शनातही मोठी पोकळी जाणवेल.
तसेच, धोनीला पाहण्यासाठी हैदराबादच्या स्टेडियममध्ये होणारी गर्दी पाहता, त्याचा संभाव्य गैरहजेरीचा निर्णय चाहत्यांसाठी मोठा धक्का ठरू शकतो. मात्र, स्पर्धेच्या उत्तरार्धात आणि प्ले-ऑफच्या सामन्यात धोनी पूर्णपणे फिट असणे संघासाठी अधिक गरजेचे आहे.





