MS Dhoni Injury : धोनीच्या दुखापतीने वाढवली धाकधूक! वॉर्म-अप मॅचमध्ये नेमकं काय घडलं? फ्लेमिंग यांच्या खुलाशामुळे चाहते चिंतेत
MS Dhoni Injury : एमएस धोनीच्या दुखापतीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, त्याचा मैदानावरील पुनरागमनाचा प्रवास लांबणीवर पडला आहे.

MS Dhoni Injury Update IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये एमएस धोनीच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. धोनीच्या दुखापतीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, त्याचा मैदानावरील पुनरागमनाचा प्रवास लांबणीवर पडला आहे. सीएसकेचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी खुलासा केला आहे.
नेमकं झालं काय?
चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी सांगितले की, धोनीच्या पोटरीची (Calf Injury) दुखापत वॉर्म-अप सामन्यादरम्यान पुन्हा एकदा गंभीर झाली आहे. यामुळे त्याच्या पुनरागमनाची प्रतीक्षा आता आणखी वाढली आहे. धोनीची दुखापत सुरुवातीला किरकोळ वाटत होती आणि तो दोन आठवड्यांत परतेल अशी चिन्हे होती. मात्र, आता स्पर्धेचा महिना उलटून गेला असून चेन्नईने ८ पैकी ५ सामने गमावले आहेत.
🚨Breaking News-
Stephen Fleming Confirmed MS Dhoni tweaked his calf during a warm-up game
Source- Cricbuzz pic.twitter.com/dZLsMnWfvF
— Mahination (@Mahiination07) April 26, 2026
स्टीफन फ्लेमिंग यांनी पुढे सांगितले की, “पोटरीची दुखापत अत्यंत संवेदनशील असते. वॉर्म-अप दरम्यान धोनीला पुन्हा त्रास जाणवू लागल्याने आम्ही कोणताही धोका न पत्करण्याचा निर्णय घेतला आहे. जर तो घाईत मैदानात उतरला असता, तर त्याला दीर्घकाळ क्रिकेटपासून लांब राहावे लागले असते.”
मैदानाबाहेर कसून सराव –
दुखापत असली तरी धोनी शांत बसलेला नाही. तो नेट्समध्ये नियमित फलंदाजीचा सराव करत असून फिजियोच्या मार्गदर्शनाखाली आपल्या फिटनेसवर काम करत आहे. सीएसके आता २ मे रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध आपल्या घरच्या मैदानात भिडणार आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी मिळालेल्या विश्रांतीमध्ये धोनी पूर्णपणे फिट होईल, अशी आशा संघ व्यवस्थापनाला आहे. सध्या चेन्नई गुणतालिकेत सहाव्या स्थानावर असून धोनीच्या अनुभवाची उणीव संघाला प्रकर्षाने जाणवत आहे.





