Manoj Jarange : मनोज जरांगेंचे पुन्हा आमरण उपोषण! तारीखही केली जाहीर; काय आहेत मागण्या?
Manoj Jarange : राज्य सरकारकडून प्रलंबित असलेले हैदराबाद जीआर मधील प्रमाणपत्रे यासह अन्य मागण्यांसाठी ते उपोषणाला बसत आहेत.

Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची हाक दिली आहे. मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे बैठक बोलावली होते. यावेळी समर्थकांना संबोधित करताना त्यांनी प्रलंबित मागण्यासाठी पुन्हा एकदा आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे.
येत्या 30 मे रोजी अंतरवली सराटी या त्यांच्या गावी ते आमरण उपोषणाला बसणार आहेत. राज्य सरकारकडून प्रलंबित असलेले हैदराबाद जीआर मधील प्रमाणपत्रे यासह अन्य मागण्यांसाठी ते उपोषणाला बसत आहेत. दरम्यान, सातारा संस्थानचा GR तुम्ही का काढला नाही? अखंड महाराष्ट्र आमचा आहे. आम्ही आठ महिने दम खाल्ला. मी आता वेळ देऊ शकत नाही. सातारा, कोल्हापूर, औंध संस्थानाचा GR काढून त्याची अंमलबजावणी करा, असे आवाहन जरांगे यांनी केले.
पुढे मनोज जरांगे म्हणाले की, “आपल्याला वारंवार लढावं लागणार आहे.आता आंदोलन असं करायचं की पुन्हा फडणवीसांना चारी दिशेला काही दिसले नाही पाहिजे. नुसते मराठेच दिसले पाहिजे. मी फडणवीसांना दोष देत नाही. तुम्ही हैदराबादचा GR काढला पण का रोखले? फडणवीस तुम्हाला मंत्री मराठ्यांनीच केलं. अधिकारी प्रमाणपत्र देत नाहीत, त्याला फडणवीस साहेबच जबाबदार आहेत. फडणवीस साहेबांनी विधानसभेत एक भाषण केलं होतं. मंत्र्यांना किंमत नाही, मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा आहेत. याचा अर्थ तुम्हीच प्रमाणपत्र रोखले आहे,” असा आरोप देखील मनोज जरांगे पाटील यांनी केला.
आपल्या समाजाचा एवढा द्वेष का? भाजपमधील मराठ्यांच्या लेकीबाळीला आरक्षण लागणार नाही का? फडणवीसांनी मराठवाड्यातील मराठ्यांना प्रमाणपत्रासाठी रोखू नये. आंदोलनाच्या तारखेच्या आत प्रमाणपत्र द्या. 58 लाख नोंदी सापडल्या त्याचे सर्व प्रमाणपत्र द्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी अभियान घेऊन प्रमाणपत्र वाटले. तसेच फडणवीसांनी करावे. शिंदे साहेबांनी जसे अभियान घेतले तसे तुम्हीही घ्या, असे आवाहन देखील त्यांनी केले. Manoj Jarange
मनोज जरांगे यांच्या मुख्य मागण्या कोणत्या?
- मराठवाड्यातील सगळ्या मराठ्यांना ३० मे च्या आत कुणबी प्रमाणपत्र द्या.
- आठ महिने झाले तरी सातारा संस्थांनाचा जीआर काढला नाही तो लवकरात लवकर काढा.
- मंत्रीमंडळ उपसमिती बरखास्त करा.
- सातारा संस्थान गॅजेट आरक्षणाचा जीआर काढा
- महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे सरसकट मागे घ्या.
- बलिदान केलेल्या कुटुंबातील सदस्यांना ३० मे च्या आत महावितरण आणि इतर ठिकाणी नोकरीला घेण्याचा जीआर काढा
- वाटप करण्यात आलेल्या कुणबी प्रमाणपत्रांच्या नोंदी ग्रामपंचायतवर लावा.
हेही वाचा:
Ramesh Chennithala : काँग्रेसमधील मोठं नाव राहुल गांधींची साथ सोडणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण






