Vidhan Parishad Election : विधान परिषदेसाठी महायुतीचा जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला निश्चित; भाजपच्या वाट्याला सर्वाधिक जागा
Vidhan Parishad Election : महायुतीच्या भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदे यांची शिवसेना यांच्यात काही जागांची अदलाबदली होण्याचीही शक्यता

Vidhan Parishad Election : राज्यातील विधानपरिषदेच्या एकूण 16 जागांसाठी निवडणूकांचे बिगुल वाजले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून हे 16 आमदार विधानपरिषदेसाठी निवडले जाणार आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या वाट्याला सर्वाधिक म्हणजे 12 जागा, शिवसेनेला 3 जागा तर राष्ट्रवादीच्या वाट्याला 2 जागा मिळणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. महायुतीच्या भाजपा, राष्ट्रवादी आणि शिंदे यांची शिवसेना यांच्यात काही जागांची अदलाबदली होण्याचीही शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत या जागा वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे.
कोणत्या ठिकाणी होणार निवडणूक?
सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, उस्मानाबाद-लातूर- बीड, हिंगोली-परभणी, संभाजीनगर-जालना या जागांसाठी ही निवडणूक लढवली जाणार आहे. दुसरीकडे, या निवडणूकीसाठी महाविकास आघाडीकडूनही तयारी सुरू आहे. Vidhan Parishad Election
कोणत्या जागेवर पक्षाचा दावा?
- राष्ट्रवादी काँग्रेस – हिंगोली – परभणी, रायगड-रत्नागिरी -सिंधुदुर्ग
- शिवसेना – ठाणे, नाशिक, यवतमाळ
- भाजप – नागपूर, वर्धा – चंद्रपूर – गडचिरोली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर – जालना, सातारा – सांगली, पुणे, जळगाव, नांदेड, भंडारा – गोंदिया, अमरावती, लातूर – धाराशीव – बीड, सोलापूर
विधानपरिषद निवडणुकीचे वेळापत्रक Vidhan Parishad Election
- विधानपरिषदेच्या या 16 जागांसाठी 25 मे रोजीपासून अर्ज दाखल करता येणार
- 1 जूनपर्यंत इच्छुकांना अर्ज दाखल करता येणार.
- 2 जूनपर्यंत अर्जांची छाननी
- अर्ज मागे घेण्याचा 4 जून शेवटचा दिवस
- 18 जून रोजी मतदान
- 22 जून रोजी मतमोजणी
हेही वाचा:






