Ketan Agarwal : जयपूरमध्ये पॅलेस, दोन विमानं बूक…भव्य लग्नाआधीच तरुणाचा धक्कादायक अंत, होणारी वधूच निघाली ‘मास्टरमाईंड’
Ketan Aggarwal : केतनच्या होणाऱ्या पत्नीनेच मित्राच्या मदतीनं त्याला दरीत ढकलून दिल्याची माहिती

Ketan Aggarwal : लोहगड किल्ल्यावरून दरीत कोसळून मृत्यू झालेल्या केतन विशाल अग्रवाल यांच्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. हा अपघात नसून एक पूर्वनियोजित कट रचून केलेली हत्या असल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झाले आहे.
केतनच्या होणाऱ्या पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने रचलेल्या कटातून झालेला खून असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. (Ketan Agarwal)
या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी केतनची होणारी पत्नी सिया प्रविण गोयल (वय २०) आणि तिचा प्रियकर चेतन बाबुलाल चौधरी (वय २२) यांना अटक केली आहे.
सुरुवातीला हा ट्रेकिंग दरम्यान झालेला अपघात असल्याचा संशय होता, मात्र लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सखोल तपास केला असता सिया आणि तिच्या मित्रांनी कट रचून हा प्रकार घडवून आणल्याचं उघडकीस आलं आहे. याशिवाय चेतन चौधरी CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यात त्याने हुडी घातली आहे, तर कानात हेडफोन घालून चेहरा लपवला आहे.

या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी केतनची होणारी पत्नी सिया प्रविण गोयल (वय २०) आणि तिचा प्रियकर चेतन बाबुलाल चौधरी (वय २२) यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया गोयल हिला केतन अग्रवालसोबत लग्न करायचं नव्हतं. हा विवाह तिला मान्य नसल्यामुळे तिने केतनला वाटेतून हटवण्याचा भयानक कट रचला. यासाठी तिने आपल्या एका मित्राची मदत घेतली. सिया गोयल हिने केतनला फिरण्यासाठी लोहगड किल्ल्यावर नेले. त्याचवेळी प्रियकर चेतन चौधरीलाही गुपचूप तेथे बोलावण्यात आले. संधी साधून दोघांनी मिळून केतनला किल्ल्यावरून ढकलून दिले, ज्यात त्याचा मृत्यू झाला.
नेमकं काय घडलं? (Ketan Aggarwal)
केतन अग्रवाल होणाऱ्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त सकाळीच दोघे मित्रांसह लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेले. किल्ल्यावर भटकंती सुरू असताना किल्ल्यावरील दरीच्या बाजूला उभे राहून केतन एका फोटोसाठी पोज देत होता. त्याचवेळी त्याला ढकललं आणि तो थेट खोल दरीत कोसळला.
केतन दरीत कोसळल्याचे पाहून त्याच्या होणाऱ्या पत्नीने मदतीसाठी आरडाओरडा केला. गडावरील इतर पर्यटकांनी आणि उपस्थितांनी या घटनेची माहिती तातडीने लोणावळा ग्रामीण पोलिसांना दिली. त्यानंतर बचाव पथकाने दरीत उतरून केतनला बाहेर काढले. मात्र, त्याला रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
17 कोटी रुपये खर्च करून पॅलेस अन् दोन विमान बुक (Ketan Aggarwal)
दरम्यान, मृत केतन अग्रवाल हा प्रसिद्ध व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा होता. त्याचं लग्न मार्केटयार्डातील मसाल्यांचे मोठे व्यापारी गोयल यांची कन्या सिया गोयल हिच्याशी ठरलं होतं. या दोन्ही मोठ्या व्यावसायिक कुटुंबांमध्ये हा विवाह सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडणार होता.
लग्नासाठी त्याच्या कुटुंबीयांनी जयपूर येथे 17 कोटी रुपये खर्च करून पॅलेस बुक केले होते. तर पाहुण्यांना जयपूर येथे घेऊन जाण्यासाठी दोन विशेष विमानांची सोय देखील केली होती. परंतु या भव्य लग्नाआधीच केतनचा धक्कादायक अंत झाला.
हेही वाचा:
US-Iran Talk: ‘आता कोणतीही भीती नाही’! इराणचे तेल जगभर पोहोचणार ; भारतासाठी आनंदाची बातमी






