Jemimah Fatima Hug : मैदानात भारत-पाक तणाव विसरल्या? जेमिमा अन् सनाच्या ‘त्या’ व्हिडिओने सोशल मीडियावर पेटला नवा वाद
Jemimah Fatima Hug : भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज आणि पाकिस्तानची महिला अष्टपैलू खेळाडू फातिमा सना यांनी सामन्यानंतर एकमेकींना मारलेली गळाभेट (Hug) सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Jemimah Rodrigues Fatima Sana Hug The Hundred Viral Video Reaction : इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या ‘द हंड्रेड’ (The Hundred) या क्रिकेट स्पर्धेतील एका सामन्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या महिला खेळाडूंमध्ये झालेला संवाद सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज (Jemimah Rodrigues) आणि पाकिस्तानची महिला अष्टपैलू खेळाडू फातिमा सना (Fatima Sana) यांनी सामन्यानंतर एकमेकींना मारलेली गळाभेट (Hug) सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दोन्ही देशांतील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर या भेटीवर क्रीडाप्रेमींमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
मैदानातील मिठीची सोशल मीडियावर चर्चा –
२०२५ मधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंमधील मैत्रीपूर्ण संवाद आणि हस्तांदोलनाची परंपरा जवळपास संपुष्टात आली होती. इतर काही क्रीडा प्रकारांत संवाद सुरू झाला असला, तरी क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडूंनी अत्यंत सावध भूमिका घेतली होती. अशातच ‘सदर्न ब्रेव्ह’ (Southern Brave) कडून खेळणाऱ्या जेमिमा आणि ‘बर्मिंघम फिनिक्स’ (Birmingham Phoenix) कडून खेळणाऱ्या फातिमा सना यांच्यातील हा व्हिडीओ समोर आल्याने नवा वाद अन् चर्चा सुरू झाली आहे.
In internationals: NO HANDSHAKE 🤝 🚫
In The Hundred: A HUG 🫂While people wondered 🇵🇰’s Fatima Sana and 🇮🇳’s Jemimah Rodrigues would shake hands, they ended up sharing a hug.
In cricket, at the end, sportsman spirit and respect for the opposition wins ✨#TheHundred… pic.twitter.com/ycCv0PsooK
— Cricketangon (@cricketangon) August 1, 2026
सामन्यात जेमिमाच्या संघाची मात –
Everyone debating if Fatima Sana and jemimah Rodrigues would shake hands and they straight up HUGGED?!😭😭🙏
Keep politics out of sports FOREVER. pic.twitter.com/XCE2lswGlg
— A. (@anhnjo) July 30, 2026
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, जेमिमाच्या सदर्न ब्रेव्ह संघाने प्रथम फलंदाजी करताना १०० चेंडूंत ३ बाद १४० धावा उभारल्या. यात जेमिमाने १८ चेंडूंत २८ धावांचे मोलाचे योगदान दिले. उत्तरार्धात १४१ धावांचा पाठलाग करताना फातिमा सनाच्या बर्मिंघम फिनिक्स संघाला ५ गडी गमावून ११६ धावांपर्यंतच मजल मारता आली. फातिमा सना ५ धावांवर नाबाद राहिली, परंतु तिच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
याआधी ‘द हंड्रेड’च्या लिलावात सनरायझर्स फ्रँचायझीची मालकिण काव्या मारन हिने पाकिस्तानी गोलंदाज अबरार अहमदवर बोली लावल्याने ती ट्रोल झाली होती.





