Twisha Sharma case: “मुलीचा मृतदेह पाहण्यापेक्षा तिचा घटस्फोट झालेला चांगला”; ट्विशा शर्मा प्रकरणात वकिलाचं मोठं विधान
Twisha Sharma case : ३३ वर्षीय ट्विशा शर्मा हिचा १२ मे रोजी भोपाळ येथील सासरी गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

Twisha Sharma case : अभिनेत्री ट्विशा शर्माच्या लग्नाला 5 महिने पूर्ण होताच तिचा संशयास्पद मृत्यू झाला, ज्यानंतर तिच्या कुटुंबियांकडून गंभीर आरोप करण्यात आले. देशभरातून संताप व्यक्त होत असलेल्या ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणाची गंभीर दखल आता थेट सुप्रीम कोर्टाने घेतली आहे.
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, “पालकांसाठी मुलीचा मृतदेह पाहण्यापेक्षा तिचा घटस्फोट झालेला केव्हाही चांगला असेल.” ही महत्त्वपूर्ण टीप्पणी देशातील सर्व पालकांकरिता आहे.
सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल एम. पंचौली यांच्या खंडपीठासमोर मध्य प्रदेश सरकारकडून एसजी तुषार मेहता हजर झाले होते. वकील सिद्धार्थ दवे आरोपीच्या कुटुंबातर्फे हजर झाले होते. (Twisha Sharma case)
दोन्ही कुटुंबांकडून आरोप – प्रत्यारोप (Twisha Sharma case)
ट्विशाचा पती समर्थ सिंग हा पेशाने वकील आहे, तर तिची सासू गिरीबाला सिंग या निवृत्त जिल्हा न्यायाधीश आहेत. दुसरीकडे ट्विशाच्या माहेरच्या लोकांनी सासरच्यांवर हुंडाबळी, मानसिक व शारीरिक छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप केला आहे. तर दुसरीकडे, सासरच्या मंडळींनी ट्विशा ड्रग्जच्या आहारी गेली असल्याचा दावा केला होता.
सरन्यायाधीशांकडून दखल
सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती विपुल एम. पंचौली यांच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली.
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी म्हटलं की, “आम्हाला राज्य पोलीस किंवा यंत्रणांच्या क्षमतेवर शंका नाही, पण या प्रकरणात ज्या प्रकारे आरोप-प्रत्यारोप होत आहेत आणि एक नॅरेटिव्ह तयार केला जात आहे, ते पाहता लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास टिकवून ठेवण्यासाठी या प्रकरणाचा तपास एका स्वतंत्र संस्थेकडे जाणे आवश्यक आहे.”
काय आहे प्रकरण?
३३ वर्षीय ट्विशा शर्मा हिचा १२ मे रोजी भोपाळ येथील तिच्या सासरी गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. या प्रकरणात आरोपी कुटुंब न्यायालयीन व्यवस्थेशी संबंधित असल्याने ट्विशाच्या कुटुंबियांकडून शंका उपस्थित केली जात आहे.
याप्रकरणात भोपाळ न्यायालयात शनिवारी आरोपी पती समर्थ सिंग याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता सीबीआय या प्रकरणाचा तपास करणार आहे.
ट्विशाचा भाऊ हर्षित याने रविवारी संध्याकाळी भोपाळमध्ये तिच्या चितेला मुखाग्नी दिला. मृत्यूच्या 12 दिवसानंतर तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
हेही वाचा:
Zeenat Aman: ‘नात्यात प्रेम आणि सन्मान महत्त्वाचा’; लिव-इन रिलेशनशिपवर जीनत अमान यांचे स्पष्ट मत






