Ishan Kishan Record : छोटा पॅकेट मोठा धमाका..! इशान किशनने मोडला किंग कोहलीचा १० वर्षांचा जुना विक्रम
Ishan Kishan Record : २०२६ पासून टी-२० फॉरमॅटमध्ये ज्याची बॅट जोरात धावत आहे, त्या इशान किशनने वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात नाबाद ३७ धावांची खेळी करत विराट कोहलीला मागे टाकत आणखी एक मोठा टप्पा गाठला.

Ishan Kishan Breaks Virat Kohli 10 Year Old Record Most T20 Runs In Calendar Year : भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यानच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने लखनौच्या एकाना स्टेडियमवर ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यरने ४२ चेंडूंत वादळी शतक ठोकले, तर यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनने (Ishan Kishan) नाबाद ३७ धावांची संयमी साथ दिली. या खेळीच्या जोरावर इशानने असा पराक्रम केला, ज्यामुळे विराट कोहलीचा तब्बल १० वर्षे जुना विक्रम इतिहासजमा झाला आहे.
इशान किशनने मोडला विराट २०१६ चा रेकॉर्ड मोडला –
टी-२० क्रिकेटमध्ये एकाच कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा भारतीय विक्रम २०१६ पासून विराट कोहलीच्या नावावर होता. विराटने २०१६ मध्ये ३१ सामन्यांच्या २९ डावांत तब्बल १६१४ धावा कुटल्या होत्या. आता इशान किशनने त्याला मागे टाकले आहे. इशानने २०२६ या वर्षात ४५ डावांमध्ये १ शतक आणि १३ अर्धशतकांच्या जोरावर १६४४ धावा फटकावत हा जागतिक दर्जाचा विक्रम आपल्या नावावर केला.
एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक टी-२० धावा करणारे भारतीय फलंदाज:
1️⃣0️⃣0️⃣-run stand 🤝
Captain Shreyas Iyer & Ishan Kishan beautifully pacing things in the middle 💙
Updates ▶️ https://t.co/2czVyKWreK
#TeamIndia | #INDvWI | @mflone_ | @ShreyasIyer15 | @ishankishan51 https://t.co/KJFAd0Ziki
— BCCI (@BCCI) October 6, 2026
- इशान किशन: १६४४ धावा (वर्ष २०२६)
- विराट कोहली: १६१४ धावा (वर्ष २०१६)
- अभिषेक शर्मा: १६०२ धावा (वर्ष २०२५)
- सूर्यकुमार यादव: १५०३ धावा (वर्ष २०२२)
- अभिषेक शर्मा: १३९५ धावा (वर्ष २०२६)
आता सूर्यकुमार यादवचा आंतरराष्ट्रीय विक्रम निशाण्यावर!
कॅलेंडर वर्षातील एकूण टी-२० धावांमध्ये अव्वल स्थान मिळवल्यानंतर आता इशानच्या नजरा आंतरराष्ट्रीय टी-२० च्या विक्रमावर लागल्या आहेत. भारतासाठी एका वर्षात आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सूर्यकुमार यादवच्या (११६४ धावा, २०२२) नावावर आहे. हा विक्रम मोडण्यासाठी इशानला आता केवळ १२३ धावांची आवश्यकता आहे. सध्याचा त्याचा फॉर्म पाहता चालू वेस्ट इंडिज मालिकेतच तो हा टप्पा सहज गाठू शकतो.





