Rahul Gandhi: ‘मी आधीच सांगितलं होतं!’, गॅस दरवाढीवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारवर घणाघात; आता पेट्रोलची बारी असल्याचा इशारा
Rahul Gandhi: या दरवाढीमुळे राजकीय वातावरण तापले असून, विरोधकांनी सरकारला घेरण्याची तयारी सुरू केली आहे.

Rahul Gandhi: देशातील निवडणुकांचे वारे ओसरताच सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईची झळ बसू लागली आहे. व्यावसायिक एलपीजी (LPG) सिलेंडरच्या दरात झालेल्या प्रचंड दरवाढीवरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. “निवडणुका संपल्यानंतर महागाईचा चटका बसणार, हे मी आधीच सांगितले होते,” अशा शब्दांत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
एकाच दिवसात ९९३ रुपयांची वाढ – (Rahul Gandhi)
शुक्रवारी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत ९९३ रुपयांची मोठी वाढ करण्यात आली, तर ५ किलोच्या सिलेंडरचे दरही २६१ रुपयांनी वधारले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांनी ‘एक्स’ (ट्विटर) वर पोस्ट शेअर केली. त्यांनी या दरवाढीला ‘ऐतिहासिक’ संबोधत म्हटले की, एका दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे.
३ महिन्यांत ८१ टक्क्यांची वाढ – (Rahul Gandhi)

Rahul Gandhi: ‘मी आधीच सांगितलं होतं!’, गॅस दरवाढीवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारवर घणाघात; आता पेट्रोलची बारी असल्याचा इशारा
सरकारच्या आर्थिक धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना राहुल गांधी यांनी आकडेवारी मांडली, फेब्रुवारीपासून आतापर्यंत एकूण १३८० रुपयांची दरवाढ झाली आहे. केवळ ३ महिन्यांत किमतीत तब्बल ८१ टक्क्यांची वाढ झाली आहे. “निवडणुकीपुरती सवलत देऊन आता जनतेवर महागाईचा बोजा टाकणे, हा सरकारचा क्रूर विनोद आहे,” असा आरोप त्यांनी केला.
कह दिया था – चुनाव के बाद महंगाई की गर्मी आएगी।
आज कमर्शियल गैस सिलेंडर ₹993 महंगा। एक ही दिन में सबसे बड़ी बढ़ोतरी। यह चुनावी बिल है।
फरवरी से अब तक: ₹1,380 की बढ़ोतरी – सिर्फ़ 3 महीनों में 81% का इज़ाफ़ा।
चायवाला, ढाबा, होटल, बेकरी, हलवाई – हर किसी की रसोई पर बोझ बढ़ा। और…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 1, 2026
लहान उद्योजक आणि सर्वसामान्यांच्या थाळीवर परिणाम –
या दरवाढीमुळे केवळ व्यावसायिकच नव्हे, तर सर्वसामान्यांचे बजेटही कोलमडणार असल्याचे राहुल गांधी यांनी नमूद केले. ते म्हणाले की, “चहाच्या टपऱ्या, ढाबे, हॉटेल्स, बेकरी आणि मिठाईची दुकाने अशा प्रत्येक छोट्या व्यवसायाचे कंबरडे या निर्णयामुळे मोडणार आहे. स्वयंपाकघरावरील हा बोजा शेवटी सामान्यांच्या थाळीपर्यंत पोहोचेल आणि अन्नाचे दरही वाढतील.”
पुढचे लक्ष्य पेट्रोल-डिझेल?
गॅस दरवाढीनंतर राहुल गांधी यांनी भविष्यातील धोक्याचीही जाणीव करून दिली आहे. गॅसनंतर आता सरकार लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतही वाढ करण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. “आधी गॅसवर वार केला, आता पुढचा घाला पेट्रोल-डिझेलवर असेल,” असा इशारा त्यांनी आपल्या पोस्टमधून दिला आहे.
या दरवाढीमुळे राजकीय वातावरण तापले असून, विरोधकांनी सरकारला घेरण्याची तयारी सुरू केली आहे.





