Anjali Damania : गुवाहाटी दौरा, व्हायरल फोटो आणि तारखांचे गूढ! अंजली दमानियांच्या पोस्टने खळबळ
Anjali Damania : या फोटोत त्या स्वतः आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी अशोक खरातसोबत गुवाहटी दौरा केला होता, असा दावा करण्यात आला.

Anjali Damania : भोंदू अशोक खरात प्रकरणाची सध्या एसआयटी चौकशी सुरू आहे. या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची सुरुवातीला एसआयटी आणि त्यानंतर काही दिवसांनी ईडीकडून चौकशी करण्यात आली.
ईडीची चौकशी संपल्यानंतर त्यांनी माध्यामांनी प्रतिक्रिया दिली. त्या प्रतिक्रियेत त्यांनी ज्या वेळी चौकशीला बोलवले जाईल त्यावेळी हजर राहून सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
तत्पूर्वी रुपाली चाकणकरांचा अशोक खरातसोबतचा एक नवीन फोटो समोर आला. या फोटोत त्या स्वतः आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी अशोक खरातसोबत गुवाहटी दौरा केला होता, असा दावा करण्यात आला.
या फोटोबाबत रुपाली चाकणकरांनी स्पष्टीकरण दिले. अशोक खरातचं कुटुंब अगोदर गेलं होतं. त्यानंतर आम्ही कुटुंबासोबत गेलो होतो. आपल्या गुरुसोबत दर्शन घेण्यासाठी आम्ही गेलो होतो.
अनेकांची श्रद्धा होती. आमचीही होती, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या होत्या. तसेच आम्ही स्वतंत्रपणे पुण्याहून प्रवास करून गेलो होतो. त्यानंतर गुवाहाटीत आम्ही अशोक खरातसोबत देवीचं दर्शन घेतलं होतं, अशी माहिती रुपाली चाकणकरांनी दिली.
काल ह्या फोटोवर, आणि गुवाहाटी वर रुपाली चाकणकर यांनी स्पष्टीकरण दिलं. प्रश्न असा की हा फोटो माध्यमांकडे अचानक कुठून आला, का मुद्दाम दिला (पेरला) गेला, हे गूढ परमेश्वराला माहीत.
त्यांचे म्हणणे आहे की त्या परिवारासकट गुवाहाटी ला गेल्या होत्या. पण ज्या माध्यमाने ती बातमी चालवली… pic.twitter.com/AXxVq0P2jF
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) May 15, 2026
या स्पष्टीकरणानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही सवाल रुपाली चाकणकरांना विचारले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर जो फोटो अगोदरच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
तो फोटो पुन्हा पोस्ट करत हा फोटो माध्यमांकडे अचानक कुठून आला, का मुद्दाम दिला (पेरला) गेला, हे गूढ परमेश्वराला माहीत, अशी शंका उपस्थित केली.
तसेच फक्त तीनच नावांचा उल्लेख केला आहे. रुपाली चाकणकर, प्रतिभा चाकणकर आणि अशोक खरात. २८ ऑगस्ट २०२१ ला खरोखर ३ माणस गेली होती की १२ माणसे गेली होती ह्याचा तपास पोलिसांनी केला पाहिजे, असंही अंजली दमानिया यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.
तसेच त्यांनी तारखांचा उल्लेख करत काही सवाल उपस्थित केले आहेत. ज्यामुळे या प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे.
नेमकं काय म्हणाल्या अंजली दामानिया? (Anjali Damania)
काल ह्या फोटोवर, आणि गुवाहाटी वर रुपाली चाकणकर यांनी स्पष्टीकरण दिलं. प्रश्न असा की हा फोटो माध्यमांकडे अचानक कुठून आला, का मुद्दाम दिला (पेरला) गेला, हे गूढ परमेश्वराला माहीत.
त्यांचे म्हणणे आहे की त्या परिवारासकट गुवाहाटी ला गेल्या होत्या. पण ज्या माध्यमाने ती बातमी चालवली त्यांनी फक्त तीनच नावांची उल्लेख केला आहे. रुपाली चाकणकर, प्रतिभा चाकणकर आणि अशोक खरात.

Anjali Damania : गुवाहाटी दौरा, व्हायरल फोटो आणि तारखांचे गूढ! अंजली दमानियांच्या पोस्टने खळबळ
१) २८ ऑगस्ट २०२१ ला खरोखर ३ माणस गेली होती की १२ माणसे गेली होती ह्याचा तपास पोलिसांनी केला पाहिजे. एक महत्वाची बाब म्हणजे, ह्या तारखेनंतर दोन महिन्यात, त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष झाल्या.
२) बरं, त्या माध्यमाच्या बातमी मधे आणि एक तारीख होती, ती म्हणजे ३०/०६/२०२३. ३० जूनला रुपाली चाकणकर ह्या पुन्हा गुवाहाटी ला गेल्या होत्या. दोन दिवस राहिल्या, आणि २ जुलै ला परत आल्या. ह्याच तारखेला अजित पवार यांनी पक्ष फोडला आणि २ जुलै ला त्यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ विधी झाला.
३) तिसरी गोष्ट, हा फोटो रॅडिसन ब्लूचा, गुवाहाटीचा नाही असे आत्तातरी वाटते.
मी ही माहिती SIT ला पाठवली आहे आणि त्यांना विनंती की त्यांनी ह्याचा तपास करावा, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.





