Sonam Kapoor : अखेर दुसऱ्या मुलाचे नाव केले जाहीर; सोनम कपूरची सोशल मीडियावर खास पोस्ट
Sonam Kapoor : या फोटोंमध्ये त्यांच्या दुसऱ्या मुलाची एक सुंदर झलकही दिसत आहे. मात्र, फोटोंमध्ये दोन्ही मुलांचे चेहरे दिसत नाहीत.

Sonam Kapoor : अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजा यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या नावाची घोषणा केली आहे.
दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर जवळपास ११ दिवसांनी सोशल मीडियावर दुसऱ्या बाळाचे नाव सोनम कपूरने शेअर केले आहे.
इन्स्टाग्रामवर सोनमने दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती स्वतः तिचा पती आनंदा आहुजा आणि दोन्ही मुलं दिसत आहेत.
या फोटोंमध्ये त्यांच्या दुसऱ्या मुलाची एक सुंदर झलकही दिसत आहे. मात्र, फोटोंमध्ये दोन्ही मुलांचे चेहरे दिसत नाहीत.
या फोटोंसोबत सोनमने कॅप्शनमध्ये एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने दुसऱ्या मुलाचे नाव रुद्रलोक ठेवले असल्याचे जाहीर केले आहे.
या नावाचा अर्थ काय आहे याचाही उलघडा तिने केला आहे. “ज्या दैवी शक्तीने पुन्हा एकदा आमचे जीवन बदलून टाकले आहे, तिच्या आशीर्वादाने, प्रेम आणि कृतज्ञतेसह, आम्ही रुद्रलोक कपूर आहुजाचे स्वागत करतो.”
या नावामागील अर्थ आणि कारण स्पष्ट करताना सोनम म्हणते, “वेदांमध्ये, रुद्र म्हणजे ‘गर्जना करणे,’ जो अत्यंत शक्तिशाली आहे.
View this post on Instagram
तो दुःखाचा नाश करणारा, वादळे, श्वास, शक्ती आणि बदलामागील दैवी शक्ती आहे. तो वायूशी, म्हणजेच सर्व जीवांमध्ये वाहणाऱ्या जीवनशक्तीशी, खोलवर जोडलेला आहे.
आमच्या पहिल्या बाळाचे नाव विष्णूच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. आमचा दुसरा मुलगा, जो विष्णूच्या कृपेने एकादशीच्या पवित्र दिवशी जन्मला, तो त्याच्या भावासोबत एक दैवी समान जोडी आहे आणि एक आशीर्वाद आहे ज्याचा आम्ही मनापासून आदर करतो.” असेही तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.
सोनमने दुसऱ्या मुलाचे नाव सांगितल्यावर चित्रपटसृष्टीतील चाहते आणि मित्रांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
२०१८ मध्ये झाले होते लग्न
सोनम आणि आनंद यांचे लग्न २०१८ मध्ये झाले. त्यानंतर २०२२ मध्ये या जोडप्याने त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले. त्यांनी त्याचे नाव वायू ठेवले. चार वर्षांनंतर २९ एप्रिल २०२६ या दिवशी या जोडप्याच्या आयुष्यात आणखी एक आनंदाचा क्षण आला.
सोनमने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. आनंद आणि सोनम दोघेही त्यांच्या दोन्ही मुलांच्या जन्मानंतर खूप आनंदी आहेत. कपूर आणि आहुजा या दोन्ही कुटुंबात देखील आनंदाचे वातावरण आहे.
हेही वाचा : गिलची फटकेबाजी अन् राशिदच्या फिरकीची कमाल! गुजरातने राजस्थानला त्यांच्याच घरात लोळवतं ठोकला विजयाचा चौकार





