Match Fixing Case : क्रिकेट विश्व हादरलं! कर्णधारावरच ‘मॅच फिक्सिंग’चा आरोप; चेन्नईतील ‘त्या’ षटकामुळे अडचणी वाढल्या
Match Fixing Case : टी-२० विश्वचषक २०२६ च्या पार्श्वभूमीवर कॅनडा क्रिकेट संघाचा कर्णधार दिलप्रीत बाजवा याच्यावर फिक्सिंगचे गंभीर आरोप झाले आहेत.

Dilpreet Bajwa Match Fixing Case : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) सध्या क्रिकेटमधील भ्रष्टाचार आणि मॅच-फिक्सिंगच्या मुद्द्यावर अत्यंत आक्रमक झाली आहे. टी-२० विश्वचषक २०२६ च्या पार्श्वभूमीवर कॅनडा क्रिकेट संघाचा कर्णधार दिलप्रीत बाजवा याच्यावर फिक्सिंगचे गंभीर आरोप झाले असून, आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने (ACU) त्याची चौकशी सुरू केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा फिक्सिंगचे भूत मानगुटीवर बसले आहे. कॅनडाचा कर्णधार दिलप्रीत बाजवा याच्यावर टी-२० विश्वचषक २०२६ मधील एका सामन्यात संशयास्पद हालचाली केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ईएसपीएनक्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, १७ फेब्रुवारी २०२६ रोजी चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर पार पडलेल्या कॅनडा विरुद्ध न्यूझीलंड सामन्याची सध्या सखोल चौकशी केली जात आहे.
The ICC’s anti-corruption unit is investigating allegations of corruption involving Cricket Canada, one of which focuses on a Canada game from the recent men’s T20 World Cup pic.twitter.com/XcwN4hvaM9
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) April 17, 2026
संशयास्पद ५ वे षटक आणि बुकींशी संपर्क –
Canada’s Captain Dilpreet Bajwa is in big trouble with fixing allegations, where he began with a no-ball, followed by a wide, and conceded 15 runs vs NZ in T20 World Cup 2026 😯
The allegations were first highlighted in the Canadian documentary aired by CBC 😨 pic.twitter.com/0gXbZhPooK
— Ajay Jadeja (@AjayJadeja171) April 17, 2026
न्यूझीलंडच्या डावातील ५ व्या षटकाने या वादाला तोंड फोडले. दिलप्रीत बाजवाने हे षटक टाकताना सुरुवातीलाच नो-बॉल टाकला आणि त्यानंतर लागलीच वाईड चेंडू फेकला. या एका षटकात त्याने १५ धावा लुटवल्या. आयसीसीच्या एसीयूला माहिती मिळाली आहे की, या सामन्यादरम्यान आणि काही टी-२० लीग्समध्ये बाजवाचा बुकींशी संपर्क झाला होता. कोणत्याही खेळाडूवर अद्याप औपचारिक आरोप निश्चित झाले नसले तरी, संशयाची सुई बाजवाकडे वळली आहे.
मोबाईल जप्त; कारकिर्दीवर टांगती तलवार –
आयसीसीने तपासाचा भाग म्हणून दिलप्रीत बाजवाचे मोबाईल फोन्स आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे ताब्यात घेतली आहेत. त्याच्या कॉल रेकॉर्ड्स आणि मेसेजेसची कसून तपासणी केली जात आहे. जर हे आरोप सिद्ध झाले, तर बाजवावर आजीवन बंदी घातली जाऊ शकते. कॅनडासाठी हा मोठा धक्का आहे, कारण बाजवाच्या नेतृत्वाखाली संघ प्रगती करत होता, मात्र या एका प्रकरणामुळे कॅनडा क्रिकेटची प्रतिमा मलीन झाली आहे.





