Cameron Green Hits Car : कॅमेरून ग्रीनच्या शॉटचा ‘कार’नामा! उत्तुंग षटकार ठोकत कारला केला डेंट अन् कमावले ५ लाख; पाहा VIDEO
Cameron Green Hits Car : गुजरात टायटन्सविरुद्ध कॅमेरुन ग्रीनने केवळ अर्धशतकच ठोकले नाही, तर त्याच्या एका गगनचुंबी षटकाराने मैदानातील कारचेही नुकसान केले.

Cameron Green Six Hits Car Video Viral : आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू कॅमेरून ग्रीन अखेर आपल्या जुन्या लयीत परतला आहे. सलग पाच सामन्यांच्या अपयशानंतर, गुजरात टायटन्स विरुद्धच्या सहाव्या सामन्यात ग्रीनने केवळ अर्धशतकच ठोकले नाही, तर त्याच्या एका गगनचुंबी षटकाराने मैदानातील कारचेही नुकसान केले. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
आयपीएल २०२६ च्या लिलावात २५.२ कोटींची विक्रमी बोली लागलेला कॅमेरून ग्रीन गेल्या काही काळापासून टीकेचा धनी ठरत होता. मात्र, गुजरात टायटन्सविरुद्ध त्याने टीकाकारांना आपल्या बॅटने चोख उत्तर दिले. १३ व्या षटकात अशोक शर्माच्या चेंडूवर ग्रीनने ‘डीप स्क्वेअर लेग’च्या दिशेने असा काही फटका मारला की, चेंडू थेट स्टेडियममध्ये प्रदर्शनासाठी ठेवलेल्या टाटाच्या कारवर जाऊन आदळला.
Making a strong statement 💪
Cameron Green getting a move on for #KKR 💜
Updates ▶️ https://t.co/FACeUzse3B#TATAIPL | #KhelBindaas | #GTvKKR | @KKRiders pic.twitter.com/utzOHFRbGx
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2026
कारवर चेंडू लागला अन् गरिब मुलांचं नशीब फळफळलं!
Green’s impact shines through
Cameron Green is making a strong impact, stepping up at the right moment with a crucial knock for KKR#GTvsKKR #IPL2026 #CameronGreen pic.twitter.com/ka813IkRjz
— MK Sharma ✍️ (@EmediaManoj) April 17, 2026
ग्रीनचा हा शॉट कारच्या साईड मिररच्या खाली लागला, ज्यामुळे कारला ‘डेंट’ पडला. मात्र, या एका शॉटमुळे गरजू मुलांचा मोठा फायदा झाला आहे. टाटा कंपनीच्या विशेष मोहिमेनुसार, जर फलंदाजाचा चेंडू थेट कारला लागला, तर कंपनी ५ लाख रुपये गरीब मुलांसाठी क्रिकेट किट खरेदी करण्यासाठी खर्च करते. ग्रीनच्या या षटकारामुळे आता अनेक होतकरू खेळाडूंना क्रिकेटचे साहित्य मिळणार आहे.
सुरुवात संथ, पण शेवट ‘झंझावाती’ –
ग्रीनच्या खेळीची सुरुवात काहीशी संथ झाली होती. एका टप्प्यावर तो २८ चेंडूंत केवळ २७ धावांवर खेळत होता. मात्र, त्यानंतर त्याने गिअर बदलला आणि केवळ ३४ चेंडूंत मोसमातील पहिले अर्धशतक पूर्ण केले. डावाच्या शेवटच्या चेंडूवर बाद होण्यापूर्वी त्याने ५५ चेंडूंत ७९ धावांची महत्त्वाची खेळी केली. या खेळीत ७ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. त्याच्या या खेळीमुळेच कोलकाता नाईट रायडर्सला १८० धावांपर्यंत मजल मारता आली.





