मोठी बातमी: राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीची घोषणा
Maharashtra News: विधानपरिषदेतील रिक्त होणार्या जागांवर निवडणुका होणार

Maharashtra News: राज्यातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदार संघासाठी अखेर निवडणूक जाहीर झाली आहे. विधानपरिषदेतील रिक्त होणार्या जागांवर निवडणुका होणार आहेत. पदवीधरसाठी औरंगाबाद, पुणे आणि नागपूर आणि शिक्षक मतदार संघासाठी अमरावती आणि पुणे विभागासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.
या निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबर (शुक्रवार) रोजी मतदान होणार असून, २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी अर्ज प्रक्रिया ही २९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे आता राजकीय हालचालींना वेग आला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने विधान परिषद निवडणुकीची घोषणा केली आहे. ज्यात महाराष्ट्रासह बिहारमध्ये ८ जागांवर, कर्नाटकात ४, आणि उत्तर प्रदेशातील ११ जागांचा समावेश आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेतील छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात सतीश चव्हाण, पुणे पदवीधर मतदारसंघातील अरूण लाड, नागपूर पदवीधर मतदारसंघातील अभिजीत वंजारी, अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून किरण रामराव सरनाईक आणि पुणे शिक्षक मतदारसंघातील जयंत आसगावकर यांचा कार्यकाळ ६ डिसेंबर २०२६ रोजी संपणार आहे. त्यामुळे या मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
संपूर्ण वेळापत्रक –
- अधिसूचना जारी : 29 सप्टेंबर 2026
- उमेदवारी अर्जाची अंतिम तारीख : 6 ऑक्टोबर 2026
- अर्जांची छाननी : 7 ऑक्टोबर 2026
- उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख : 9 ऑक्टोबर 2026
- मतदान : 23 ऑक्टोबर 2026
- मतमोजणी आणि निकाल : 27 ऑक्टोबर 2026
ECI च्या माहितीनुसार, पदवीधर मतदारसंघासाठी पात्रतेच्या निकषांनुसार संबंधित व्यक्ती पदवीधर असणे आवश्यक आहे, तर शिक्षक मतदारसंघासाठी निर्धारित कालावधीत पात्र शैक्षणिक संस्थेत अध्यापनाचा अनुभव असणे आवश्यक असते.
हेही वाचा:
Breakfast Scheme : मुलांसोबत बसून मुख्यमंत्र्यांनी केला शाळेचा नाश्ता ; VIDEO तुफान व्हायरल





