India A Squad : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! कर्णधार बदलला; हार्दिक पंड्याची संघात एन्ट्री
India A Squad : निवड समितीने रणनीतीचा भाग म्हणून दोन्ही फॉरमॅटसाठी वेगवेगळ्या कर्णधारांची निवड केली आहे.

India A Squad Announced Australia A Tour Ruturaj Gaikwad Padikkal Hardik Pandya : ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्ध पुदुचेरी येथे खेळल्या जाणाऱ्या बहुप्रतिक्षित मालिकेसाठी बीसीसीआयने (BCCI) ‘भारत अ’ संघाची अधिकृत घोषणा केली आहे. २२ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या हाय-प्रोफाइल मालिकेत दोन चारदिवसीय (मल्टी-डे) आणि तीन लिस्ट ‘अ’ (एकदिवसीय) सामने खेळवले जाणार आहेत. निवड समितीने रणनीतीचा भाग म्हणून दोन्ही फॉरमॅटसाठी वेगवेगळ्या कर्णधारांची निवड केली असून, डावखुरा फलंदाज देवदत्त पडिक्कल बहुदिवसीय संघाचे नेतृत्व करेल, तर एकदिवसीय मालिकेची धुरा ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आली आहे.
पडिक्कलकडे मल्टी-डे संघाचे कर्णधारपद; साई सुदर्शनकडे उपकर्णधारपदाची धुरा!
बहुदिवसीय सामन्यांसाठी घोषित १५ सदस्यीय संघात देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने खोऱ्याने धावा करणाऱ्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. अमन मोखाडे, आयुष पांडे, साई सुदर्शन (उपकर्णधार), यश राठोड आणि शेख रशीद यांच्यावर फलंदाजीची भिस्त असेल. यष्टीरक्षक म्हणून कुमार कुशाग्र आणि एन. जगदीसन यांची निवड झाली आहे. गोलंदाजीत मुंबईचे रणजी विजेते अष्टपैलू शम्स मुलानी आणि तनुष कोटियन फिरकी सांभाळतील; तर वेगवान आक्रमणाची जबाबदारी तुषार देशपांडे, अंशुल कंबोज, प्रफुल्ल हिंगे, नचिकेत भुते आणि व्ही. वैशाक यांच्यावर राहील.
एकदिवसीय संघात हार्दिक पंड्याची सरप्राईज एन्ट्री –
🚨 News 🚨
India A squad announced for home series against Australia A, comprising two multi-day matches and three one-day games in Puducherry.
Details 🔽https://t.co/qv3pB2OLhj pic.twitter.com/svfhQbnEoV
— BCCI (@BCCI) September 9, 2026
ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील एकदिवसीय संघात अनुभव आणि स्फोटक फलंदाजांचे जबरदस्त मिश्रण पाहायला मिळत आहे. काही काळ वरिष्ठ संघाबाहेर असलेला भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या या मालिकेतून मैदानात पुनरागमन करणार असून त्याच्या निवडीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्याच्यासोबत देवदत्त पडिक्कल (उपकर्णधार), प्रियांश आर्य, रजत पाटीदार आणि नमन धीर यांना मधल्या फळीत स्थान मिळाले आहे, तर प्रभसिमरन सिंग आणि कुमार कुशाग्र यांच्यावर विकेटकीपिंगची जबाबदारी असेल.
युवा अष्टपैलूंचा भरणा; २२ सप्टेंबरपासून पुदुचेरीत महामुकाबला –
🚨 BREAKING 🚨
India A have announced their squads for the upcoming multi-day and one-day series against Australia A! 🇮🇳🏏
Hardik Pandya has been added to the One-Day squad, subject to fitness! 🌟#IndiaA #DevduttPadikkal #HardikPandya #Sportskeeda pic.twitter.com/N4URp6eCcJ
— Sportskeeda (@Sportskeeda) September 9, 2026
वनडे संघात निशांत सिंधू, विपराज निगम, अर्शीन कुलकर्णी आणि अर्शद खान या अष्टपैलू खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे, तर गोलंदाजीत गुरजपनीत सिंग आणि यश ठाकूर यांना संधी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियासारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध घरच्या मैदानावर होणारी ही मालिका भारतीय राखीव फळीची ताकद अजमावण्यासाठी आणि राष्ट्रीय संघाच्या निवडीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.





