Jantar Mantar 2.0: अभिजीत दिपकेंसह आशुतोष रांका आणि सौरभ दास अटकेत; आता सीजेपी आंदोलनाची धुरा महाराष्ट्रातील ‘या’ तरुणाकडे..
Jantar Mantar 2.0: दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली

Jantar Mantar 2.0: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी कॉकरोच जनता पार्टीने केली आहे. याकरिता सीजेपीकडून आज दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलनाची हाक देण्यात आली. मात्र आंदोलनाच्या आधीच पोलिसांनी CJP चे संस्थापक अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना अटक केली. थेट विमानातून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. या कारवाईनंतर आता अभिजीत दिपके यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात त्यांनी या आंदोलनाची पुढची धुरा कोण सांभाळणार? हे स्पष्ट केले आहे.
व्हिडिओमध्ये काय म्हणाले अभिजीत दिपके?
तिघांच्या अटकेनंतर पुढील आंदोलनाची दिशा अजिंक्य शिंदे हा मराठी तरुण सांभाळणार आहे. अभिजीत दिपके व्हिडिओमध्ये म्हणत आहेत की, “हॅलो एव्हरीवन. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल, तर याचा अर्थ मी, आशु आणि सौरभ आम्ही तिघेही अटक झालो आहोत. आमच्यानंतर या मुव्हमेंटला अजिंक्य लीड करेल. तर तुम्ही जेवढेही हे व्हिडिओ पाहत आहात, कृपया अजिंक्य शिंदेंना फॉलो करा. आशुतोष, मी आणि सौरभनंतर ते ‘कॉकरोच जनता पार्टी’ पुढे चालवतील. धन्यवाद.”
आता अजिंक्य शिंदे याआंदोलनाची पुढील धुरा सांभाळणार आहेत. दरम्यान, या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांना ताब्यात घेतले, सरन्यायाधीशांच्या हस्तक्षेपानंतर त्यांची सुटका करण्यात आली होती.
IMPORTANT
Until Abhijeet Dipke, Saurav Das and Ashutosh Ranka are in detention, CJP’s Organization In-Charge Ajinkya Shinde will lead this protest at Jantar Mantar.
Abhijeet had pre-recorded this video last night in anticipation of a potential arrest. @AjinkyaCJP https://t.co/WSQ69mKfTV
— Cockroach Janta Party – CJP (@Cockroachisback) October 10, 2026
दिल्लीत सुरक्षा व्यवस्था तैनात
दिल्लीत सध्या सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. जवळपास तब्बल 25 हजार पोलीस आणि निमलष्करी जवान तैनात करण्यात आले आहेत. 45 मेट्रो स्थानकांवर प्रवेश आणि निर्गमनावर निर्बंध घालण्यात आले आहेत, तर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीच्या सीमा, रेल्वे स्थानक बस टर्मिनल्स आणि इतर संवेदनशील स्थळी सुरक्षा आणि निगराणी वाढवण्यात आली.
कोण आहे अजिंक्य शिंदे?
अजिंक्य शिंदे हा कॉकरोच जनता पार्टीचा राष्ट्रीय संघटना प्रभारी पदावर काम करतो. ३५ वर्षांचे अजिंक्य शिंदे हे मूळचे महाराष्ट्राच्या लातूरमधील आहेत. दीपके आणि अंजिक्य यांची पहिली भेट २०१६ मध्ये गोव्यात झाली. अजिंक्य शिंदे यांनी यापूर्वी महाराष्ट्र आणि गोव्यात’आम आदमी पार्टी’ च्या युवा आघाडीचे संयोजक व सह-प्रभारी म्हणून काम पाहिले आहे.
लातूर जिल्ह्यातील उजनी येथील युवक अजिंक्य शिंदे यांनी दिल्ली येथील जंतर-मंतरवर नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ युवकांच्या आंदोलनात पडद्यामागे राहून मुख्य सूत्रधाराची महत्वाची भूमिका पार पाडली होती. दरम्यान, राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी अजिंक्य शिंदे यांनी खाजगी क्षेत्रातही काम केले आहे. ते कॉम्प्युटर सायन्स पदवीधरअसून त्यांनी पुण्यात अनेक वर्षे एका आंतरराष्ट्रीय आयटी कंपनीत नोकरी केली आहे.
हेही वाचा:





