Amitesh Kumar: पोलीस आयुक्तांचे टेन्शन वाढले!
Amitesh Kumar:

कार्यक्षमतेवर प्रश्न करणे योग्य नाही; पोलीस आयुक्त अमितेश कुमार
Amitesh Kumar: जिल्हा सत्र न्यायालयाबाहेरील रक्तरंजीत थराराची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. यासोबतच पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सडकून टीका केली आहे.
या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे टेन्शन वाढले आहे. त्यांनी टीकाकरांना उत्तर देताना मागील सहा महिन्यांत पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे. यामुळे पोलीस आयुक्त आणि पोलीस दलाच्या कार्यक्षमेवर लगेच प्रश्न उपस्थित करणे योग्य नसल्याचे स्पष्ट केले.
आयुक्त म्हणाले, की सरकारला गंभीर घटनेची माहिती देणे क्रमप्राप्त असते. त्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती देण्यात आली. त्यांनी पोलीस दलाबद्दल पसरलेल्या नरेटीव्ह रिव्हर्स करण्याच्या दृष्टीने कडक पावले उचलण्यास सांगितले आहे. त्यामुळे प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गौहर हसन यांच्याकडे आज सोपवला आहे. पोलिसांनी ही घटना गांभीर्याने घेतली आहे.
खुनाची सुपारी Amitesh Kumar:
मंदार किवळे याच्या खुनाची सुपारी मुख्य आरोपी अक्षय सुभाष चव्हाण आणि अमोल रामचंद्र चव्हाण यांनी सुपारी दिली होती. त्यांनी एका फरार आरोपीस शस्त्र आणण्यासाठी आगाऊ ५० हजार रुपये पंधरा दिवसांपूर्वीच दिले होते. तेव्हा त्याचा वापर कशासाठी करायचे, हे उघड केले नव्हते.
मात्र, हल्ल्याच्या आदल्या दिवशी अक्षयने त्याच्या अपूर्ण असलेल्या बांधकाम साइटवर साथीदारांना आणि सुपारी दिलेल्या सात जणांना बोलावून घेतले होते. तेथे रात्री बैठक झाल्यावर किवळेच्या खुनाचा कट रचला. किवळे न्यायालयीन तारखेला येणार असल्याने तेथे सापळा रचण्यात आला.
फेस डिटेक्शन कॅमेऱ्याने आरोपी जाळ्यात Amitesh Kumar:
घटनास्थळी दोन दुचाकींवरून सहा आरोपी दाखल झाले होते. त्यांच्या दुचाकींना नंबर प्लेट नव्हती. मात्र, परिसरातील कॅमेऱ्यात यातील एका आरोपीची छबी व्यवस्थित टिपली गेली. ते छायाचित्र सिस्टीमध्ये टाकल्यावर आरोपी बारामतीच्या दिशेने गेल्याचे स्पष्ट झाले. ग्रामीण पोलिसांकडे ही माहिती पाठविल्यानंतर एक आरोपी शेतात घुसल्याची माहिती मिळाली. त्याचा माग काढण्यासाठी पुणे पोलिसांनी ड्रोनही पाठवले होते.





