Tiger Shroff Case: सलमान खान, रोहित शेट्टी आणि आता टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर बॉलीवूडमधील सेलिब्रिटींची सुरक्षा धोक्यात?
Tiger Shroff Case: बाबा सिद्दीकींनाही दोन वर्षापूर्वी गोळ्या झाडून संपवलं

Tiger Shroff Case: मुंबईतील जुहू परिसरात बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हात असावा, या शक्यतेची पोलीस चौकशी करत आहेत. या घटनेनंतर पुन्हा एकदा मुंबईमधील बॉलिवूड कलाकारांवर होणारा गोळीबार चर्चेत आला असून कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. (Tiger Shroff Case)
अभिनेता सलमान खानला वारंवार मिळणाऱ्या धमक्या, बाबा सिद्दिकी यांची झालेली हत्या, दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर झालेला गोळीबार आणि आता अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेला गोळीबार…या समोर आलेल्या सलग घटनांमुळे लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने निर्माण होणारी दहशत पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.
२९ मे २०२२ रोजी पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळीचे नाव समोर आले आणि या टोळीच्या संघटित गुन्हेगारी कारवायांची देशभर चर्चा रंगली. त्यानंतर चित्रपटसृष्टीतील कलाकारांना धमक्या देणे, त्यांच्यावर दबाव निर्माण करणे आणि गोळीबाराच्या घटनांच्या माध्यमातून दहशत पसरवण्याचे आरोप सातत्याने समोर येत राहिले.
बाबा सिद्दीकींची गोळ्या झाडून हत्या (Tiger Shroff Case)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर 2024 च्या रात्री मुंबईतील वांद्रे परिसरात त्यांचे आमदार पुत्र झीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. Tiger Shroff Case
याआधी एप्रिल 2024 मध्ये अभिनेता सलमान खानच्या बांद्रा येथील गॅलेक्सी अपार्टमेंटवर अभिनेत्याच्या निवासस्थानाबाहेर दोन अज्ञातांनी मोटारसायकलवर येऊन 5 राउंड गोळीबार केला होता. लॉरेन्स बिश्नोई गँगने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती.
रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानाबाहेर गोळीबार (Tiger Shroff Case)
फेब्रुवारी 2026 मध्ये मुंबईतील जुहू भागात प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानाबाहेर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणातही पोलिसांनी तपासादरम्यान काही संशयितांना आणि शूटर्सना अटक केली आहे.
यानंतर १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या जुहू परिसरातील पुष्पा नरसी पार्कजवळ अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा मुलगा टायगर श्रॉफ याच्या गाडीवर गोळीबार झाल्याची घटना घडली. या घटनेतही लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सहभाग असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र मनोरंजन क्षेत्रातील कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शक यांना लक्ष्य करून दबाव निर्माण करण्याचे प्रकार वारंवार समोर येत असल्याने कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. Tiger Shroff Case
हेही वाचा:





