AFC Matches Postponed : इराणवरील हल्ल्यांनंतर एएफसी चॅम्पियन्स लीगचे सामने तडकाफडकी स्थगित; रोनाल्डोच्या ‘अल-नसर’लाही फटका
AFC Matches Postponed : खेळाडू आणि चाहत्यांच्या सुरक्षेचा विचार करून आशियाई फुटबॉल महासंघाने (AFC) या आठवड्यात होणारे सर्व महत्त्वाचे सामने तातडीने स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

AFC Matches Postponed Iran : मध्य पूर्वेतील इराणवर इस्रायल आणि अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांनंतर संपूर्ण परिसरात युद्धाचे ढग दाटले आहेत. या तणावपूर्ण परिस्थितीचा मोठा फटका आता क्रीडा विश्वाला, विशेषतः आशियाई फुटबॉलला बसला आहे. खेळाडू आणि चाहत्यांच्या सुरक्षेचा विचार करून आशियाई फुटबॉल महासंघाने (AFC) या आठवड्यात होणारे सर्व महत्त्वाचे सामने तातडीने स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
एएफसी चॅम्पियन्स लीगचे सामने लांबणीवर –
रविवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत पत्रकानुसार, सोमवारी आणि मंगळवारी होणारे ‘एएफसी चॅम्पियन्स लीग एलिट’च्या (AFC Champions League Elite) राउंड ऑफ १६ मधील महत्त्वाचे सामने आता नियोजित वेळेत होणार नाहीत. इराणमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवरील निर्बंध लक्षात घेता महासंघाने हा कठोर निर्णय घेतला आहे.
रोनाल्डोच्या चाहत्यांची प्रतीक्षा वाढली –
𝙏𝙃𝙀 𝙇𝙀𝙂𝙀𝙉𝘿 𝙆𝙀𝙀𝙋𝙎 𝙍𝙄𝙎𝙄𝙉𝙂. 𝙏𝙃𝙀 𝘽𝘼𝙍 𝙆𝙀𝙀𝙋𝙎 𝙂𝙀𝙏𝙏𝙄𝙉𝙂 𝙃𝙄𝙂𝙃𝙀𝙍.
7️⃣0️⃣ International Goals!
✅ Australia’s all-time top scorer
🇦🇺 Sam Kerr 🤩 Icon 💫 Inspiration 💪 Superstar ⭐#WAC2026 pic.twitter.com/6zGM0D6vOy— #WAC2026 (@afcasiancup) March 1, 2026
या निर्णयाचा सर्वाधिक फटका पश्चिम विभागातील ‘एएफसी चॅम्पियन्स लीग २’ आणि ‘एएफसी चॅलेंज लीग’ला बसला आहे. फुटबॉलचा सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो ज्या संघाकडून खेळतो, तो सौदी अरेबियाचा अल-नसर हा संघ चॅम्पियन्स लीग २ मध्ये मैदानात उतरणार होता. मात्र, आता या संघासह इतर सर्व संघांच्या सामन्यांच्या नव्या तारखांसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मंगळवार आणि बुधवारी होणारे उपांत्यपूर्व फेरीचे सामने अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहेत.
नव्या वेळापत्रकाबाबत साशंकता –
आशियाई फुटबॉल महासंघाने अद्याप या सामन्यांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केलेले नाही. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असे महासंघाने स्पष्ट केले आहे. पश्चिम आशियातील तणाव जोपर्यंत कमी होत नाही, तोपर्यंत या सामन्यांचे आयोजन करणे कठीण असल्याचे बोलले जात आहे.
लेले नाही.





