Tushar Gaikwad Passes Away : वर्षा गायकवाड यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर; भावाच्या निधनाने खचल्या, म्हणाल्या “तुला फार त्रास…”
Tushar Gaikwad Passes Away : आज आमच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली…माझा लाडका दादा तुषार आम्हाला कायमचा सोडून गेला असे म्हणत त्यांनी भावासोबत घालवलेल्या आठवणींना उजाला देत दु:ख व्यक्त केले.

Tushar Gaikwad Passes Away : मुंबईतून एक दुःखद बातमी समोर येत आहे. काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांचे बंधू आणि काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांचे पुत्र तुषार गायकवाड यांचे निधन झाले आहे.
त्यांच्या निधनाची बातमी स्वतः वर्षा गायकवाड यांनी सोशल मीडियावरुन पोस्ट करत दिली आहे. आज आमच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली…माझा लाडका दादा तुषार आम्हाला कायमचा सोडून गेला असे म्हणत त्यांनी भावासोबत घालवलेल्या आठवणींना उजाला देत दु:ख व्यक्त केले.
आज आमच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली…माझा लाडका दादा तुषार आम्हाला कायमचा सोडून गेला
लहानपणापासून प्रत्येक संकटात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा तू.. माझ्या प्रत्येक आनंदात सहभागी होणारा तू.. आणि माझ्या प्रत्येक दुःखात आधार देणारा तू.. आज अचानक निघून गेलास…
तू फक्त… pic.twitter.com/WgcSqgZxfD
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) May 19, 2026
नेमकं काय म्हणाल्या वर्षा गायकवाड?
लहानपणापासून प्रत्येक संकटात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा तू.. माझ्या प्रत्येक आनंदात सहभागी होणारा तू.. आणि माझ्या प्रत्येक दुःखात आधार देणारा तू.. आज अचानक निघून गेलास…
तू फक्त माझा भाऊ नव्हतास, तर माझा मित्र, मार्गदर्शक आणि पक्का सोबती होतास. अण्णा गेल्यानंतर तूच आमची सावली होतास. तुझ्याशिवाय आयुष्याची कल्पनाही करणं माझ्यासाठी अवघड आहे.
आपण एकत्र घालवलेले आनंदाचे गोड क्षण, हसणं, गप्पा-गोष्टी, अविस्मरणीय आठवणींच्या रूपाने तू सदैव जिवंत राहशील.
दादा, गेले काही दिवस तुला फार त्रास सहन करावा लागला; पण आता तुझा पुढील प्रवास शांतमय होवो…
जिथे कुठे असशील तिथे आनंदी राहा. Will miss you, Tushardada! असे अत्यंत जड अंतकरणाने वर्षा गायकवाड यांनी आपले दुःख पोस्टद्वारे व्यक्त केले आहे.
कोण होते तुषार गायकवाड?
एकनाथ गायकवाड हे महाराष्ट्र काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते होते. त्यांनी पक्षाच्या विविध पदांवर काम केले होते. २०२१ मध्ये कोविड-१९ मुळे त्यांचे निधन झाले. आता २०२६ मध्ये त्यांचा मुलगा तुषार गायकवाड यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनामुळे गायकवाड कुटुंब शोकसागरात बुडाले आहे.
तुषार गायकवाड यांच्या मृत्यूचे नेमकं कारण काय आहे याबाबत माहिती मिळू शकलेले नाही. मात्र, वर्षा गायकवाड यांच्या पोस्टवरुन तुषार हे आजारी असून त्यांचा आजारपणात मृत्यू झाल्याचा अंदाज बांधला जात आहे. तुषार गायकवाड यांच्या निधनामुळे त्यांचे समर्थक आणि पक्ष कार्यकर्त्यांमध्ये दुःखाची लाट पसरली आहे.
वर्षा गायकवाड यांच्याबद्दल
तुषार यांचे वडील, एकनाथ गायकवाड हे काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते होते आणि आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत ते पक्ष आणि गांधी घराण्याशी एकनिष्ठ राहिले. गायकवाड घराण्याचा मुंबई आणि दलितबहुल भागांमध्ये मोठा प्रभाव आहे. तुषार यांची बहीण, वर्षा गायकवाड यादेखील राजकारणात सक्रिय असून, त्यांनी धारावी मतदारसंघातून आमदार म्हणून काम केले आहे आणि सध्या त्या मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून खासदार आहेत. वर्षा गायकवाड यांनी राज्य सरकारमध्ये मंत्री म्हणूनही काम केले आहे.
पक्षासाठी धक्कादायक बातमी
तुषार यांचे काँग्रेस पक्षाशी असलेले राजकीय संबंध त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीतून आले होते. त्यांनी कोणतेही मोठे पद भूषवले नसले तरी, स्थानिक पातळीवर पक्षासाठी ते खूप महत्त्वाचे मानले जात होते. त्यांच्या निधनाची बातमी पक्ष आणि कार्यकर्त्यांसाठी एका मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नाही.
हेही वाचा : Welcome to the Jungle: ‘आलू ले लो… कांदे ले लो’; ‘वेलकम टू द जंगल’च्या गाण्यात 25 कलाकरांची एकत्र धमालमस्ती





