Uddhav Thackeray : ‘पाणी कुठपर्यंत मुरलंय ते कळू द्या’; अशोक खरात प्रकरणावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया समोर

Uddhav Thackeray : राज्यात गाजत असलेल्या कॅप्टन अशोक खरात प्रकरणावर उद्धव ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Updated On:
Uddhav Thackeray : ‘पाणी कुठपर्यंत मुरलंय ते कळू द्या’; अशोक खरात प्रकरणावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया समोर

Uddhav Thackeray : मुंबईत एक्सपोर्ट इम्पोर्ट लॉजिस्टिक कोर्सचा शुभारंभ माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी लॉजिस्टिक कोर्स सुरू करण्याच्या उद्देश काय याबाबत सांगितले. तसेच राज्यात गाजत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर उद्धव ठाकरे यांनी भाष्य करत आपली पहिली प्रतिक्रिया दिली.

उद्धव ठाकरे काय म्हणाले? Uddhav Thackeray

अजून किती खालच्या पातळीवर आपण उतरणार आहोत. जादूटोणा विरोधी कायदा आपल्याकडे आहे, पण कायद्याचे पालक करणारेच त्यांच्या नादी लागणार असतील, तर त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. आम्ही महाराष्ट्रला पुढे नेणार आहोत, हा विषय घेऊन पुढे जातोय. पण, टाचण्या, लिंबाचा विषय समोर आलाय हे योग्य नाही, अशी पहिली प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.

 uddhav thackeray

अशोक खरात प्रकरणावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया समोर uddhav thackeray

पुढे ते म्हणाले, एपस्टीन फाईलमधून कोणाचं लक्ष उडू नये यासाठी सगळ्या गोष्टी सुरू आहेत. अनेक फोटो आणि नावं समोर येत आहेत, ज्यांचं कर्तृत्व नाही त्यांना असे मार्ग घ्यावे लागतात, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

हेही वाचा : Telegram Trick: टेलिग्रामवर फोटो-व्हिडिओची क्वालिटी कमी होते? ही सोपी ट्रिक ठेवेल ओरिजिनल गुणवत्ता कायम

तुम्ही सगळ्यांची चौकशी करा. कारण, पाणी कुठपर्यंत मुरलंय ते कळू द्या, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात भोंदू बाबाला पाणी देण्यासाठी केलेल्या मदतीवरूनही स्पष्टीकरण दिले.

उद्धव ठाकरेंची मागणी Uddhav Thackeray

यानिमित्ताने गावोगावी असलेल्या भोंदूबाबांवर कारवाई झाली पाहिजे, त्यांच्याकडे कुठल्याही पक्षाचा झेंडा असला तरी कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

हेही वाचा : Aarti Singh : बिकिनीमधील फोटोवरून ट्रोल करणाऱ्यांना आरती सिंहने दिले सडेतोड उत्तर

आणखी संबंधित बातम्या

Uddhav Thackeray : भोंदूगिरी समूळ नष्ट करा; उद्धव ठाकरे यांची सरकारवर सडकून टीका

2026-03-21 19:11:15

Uddhav Thackeray : भोंदूगिरी समूळ नष्ट करा; उद्धव ठाकरे यांची सरकारवर सडकून टीका

Ashok Kharat : 'या' दिवशी अशोक खरातचा एन्काऊंटर होणार; महिला नेत्याच्या दाव्याने उडाली खळबळ

2026-03-21 17:50:22

Ashok Kharat : 'या' दिवशी अशोक खरातचा एन्काऊंटर होणार; महिला नेत्याच्या दाव्याने उडाली खळबळ

Gold and Silver Prices : सोन्याच्या भावात घसरण कायम! चांदीचा भाव किती? जाणून घ्या महाराष्ट्रातील आजचे ताजे दर

2026-03-21 12:58:18

Gold and Silver Prices : सोन्याच्या भावात घसरण कायम! चांदीचा भाव किती? जाणून घ्या महाराष्ट्रातील आजचे ताजे दर

Chhagan Bhujbal : राजकीय वर्तुळात खळबळ! कॅप्टन खरात प्रकरणावर भाष्य करताना छगन भुजबळांचा मोठा खुलासा " आपल्यालाही काही लोक .."

2026-03-21 12:32:23

Chhagan Bhujbal : राजकीय वर्तुळात खळबळ! कॅप्टन खरात प्रकरणावर भाष्य करताना छगन भुजबळांचा मोठा खुलासा " आपल्यालाही काही लोक .."

Anjali Damania : "राजीनामा सोपवताना मॉडेलिंगसारखी पोझ, चेहऱ्यावर अहंकार..."; अंजली दमानियांची चाकणकरांवर सडकून टीका

2026-03-21 11:45:13

Anjali Damania : "राजीनामा सोपवताना मॉडेलिंगसारखी पोझ, चेहऱ्यावर अहंकार..."; अंजली दमानियांची चाकणकरांवर सडकून टीका