Aarti Singh : बिकिनीमधील फोटोवरून ट्रोल करणाऱ्यांना आरती सिंहने दिले सडेतोड उत्तर
Aarti Singh : तुम्हाला माझे फोटो आवडत नसतील तर तुम्ही मला अनफॉलो करू शकता. कमेंटमध्ये काहीही लिहिलं तरी त्यातून तुमचे संस्कार दिसतात - आरती सिंह

Aarti Singh : टीव्ही अभिनेत्री आरती सिंह तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सध्या ती पती दीपक चौहानसोबत थायलंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत असून तिथले फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे.
तिने इंस्टाग्रामवर बिकिनीमधील काही फोटो शेअर केले होते. या फोटोंवरून सोशल मीडिया यूजर्सनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. मात्र ट्रोल करणाऱ्यांना आरतीने सडेतोड उत्तर दिले. Aarti Singh
सुरुवातीला तिने ट्रोलिंगमुळे ते फोटो हटवले होते, पण काही काळानंतर तिने पुन्हा गुलाबी बिकिनीमधील फोटो शेअर करत आपली भूमिका मांडली.
तिने पोस्टमध्ये लिहिले की, ‘माझं आयुष्य, माझे नियम. माझं शरीर आहे आणि कपडे घालण्याचा निर्णयही माझाच असेल. आपण सतत विचार करतो की लोक काय म्हणतील, पण एक दिवस असा येतो की आपल्याला जाणवतं आपल्याला जे मनापासून करायचं होतं, तेच करायला हवं होतं. ज्यांच्याबद्दल आपण विचार करतो ते आपल्याला ओळखतही नसतात.’
View this post on Instagram
मागच्या वेळी जेव्हा मी बिकिनी फोटो पोस्ट केले, तेव्हा काही लोकांनी मला अनफॉलो केलं. त्याचा माझ्यावर परिणाम झाला आणि मी फोटो डिलीट केले. पण काही दिवसांपूर्वी माझी जिवलग मैत्रीण शेफाली हिचं निधन झालं. तेव्हा मला जाणवलं की आयुष्य किती अनिश्चित आहे. आपण जे आपल्याला खरंच आनंद देतं, ते का करू नये?’
तिने ट्रोलर्सना उद्देशून स्पष्ट शब्दांत म्हटले, ‘मी कोणालाही दुखावत नाही. तुम्हाला माझे फोटो आवडत नसतील तर तुम्ही मला अनफॉलो करू शकता. कमेंटमध्ये काहीही लिहिलं तरी त्यातून तुमचे संस्कार दिसतात. जे लोक मला खरोखर प्रेम करतात ते मला जशी आहे तशी स्वीकारतील.’ Aarti Singh
आरती सिंह ही बॉलिवूड अभिनेता गोविंदाची भाची आहे. तिने २००७ मध्ये ‘मायका’ या मालिकेतून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. तेव्हापासून ती अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये झळकली आहे. Aarti Singh
हेही वाचा:
How Ho Increase Hemoglobin: शरीरात रक्ताची कमतरता आहे? या घरगुती आहाराने वाढवा हिमोग्लोबिन





