Krishnaraj Mahadik | कोल्हापूरच्या राजकारणात महाडिकांची तिसरी पिढी उतरणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक यांची आता राजकारणात एन्ट्री होण्याची शक्यता आहे. कृष्णराज महाडिक हे भाजपकडून कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मधून रिंगणात उतरु शकतात, अशी माहिती समोर येत आहे. विधानसभेत जाण्यासाठी इच्छूक, पण… कृष्णराज महाडिक यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याची माहिती आहे. परंतु कृष्णराज महाडिक यांनी उमेदवारी अर्ज घेतला असला तरी तो दाखल करणार का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कारण कृष्णराज हे विधानसभेत जाण्यासाठी इच्छूक होते. कृष्णराज महाडिक यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी केली होती. मात्र, त्यांना संधी मिळाली नव्हती. त्यानंतर आता ते कोल्हापूर महानगरपालिकेच्या रिंगणात उतरणार असल्याचे समोर आले आहे, मात्र याबाबत त्यांनी अधिकृतरित्या घोषणा केलेली नाही. Krishnaraj Mahadik | कृष्णराज महाडिक कोण आहेत? राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक हे सोशल मीडियावर सक्रिय असून ते क्रिश महाडिक या नावाने प्रसिद्ध आहेत. सोशल मीडियावरुन कोल्हापूरमधील सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर ते भाष्य करतात. अनेक गावातील वास्तव ते व्हिडिओच्या माध्यमातून समोर आणतात. एक युट्यूबर म्हणून देखील त्यांनी स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. Krishnaraj Mahadik | दरम्यान, भाजप कोल्हापूरची महापालिका उमेदवारांची यादी आज किंवा उद्या जाहीर होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यात कृष्णराज महाडिकांचेही नाव असण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या राजकारणात एक नवं नेतृत्व पाहायला मिळणार असल्याने अनेकांकडून आनंदही व्यक्त केला जात आहे. हेही वाचा: सयाजी शिंदे यांच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; निसर्गप्रेमींकडून हळहळ व्यक्त