Rinku Rajguru : रिंकू अन् भाजप खासदाराच्या चिरंजीवांचा ‘तो’ फोटो व्हायरल; भावा सैराट झालं जी! सोशल मीडियावर चर्चांना उधाण

सैराट या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री रिंकू राजगुरू हे नाव घराघरात पोहचलं. रिंकू मराठी बरोबरच आता हिंदी चित्रपटातही आपला अभिनय करताना दिसत आहे. इन्स्टावर रिंकू सक्रिय असून तिच्या डेली रुटीनचे फोटो, व्हिडिओ ती शेअर करत असते. तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचे वेगवेगळे लूक्स पाहिला मिळतात. मात्र, आता तिने नाही तर एका खासदाराच्या चिरंजीवाने शेअर केलेल्या फोटोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा केली जात आहे.
तसेच रिंकू कधी वर्कआउट करत असते तर कधी ती भटकंती करायला जात असते. याचेही फोटो आणि व्हिडिओ ती इन्स्टावर आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. मात्र, अभिनेत्री रिंकू आणि एका खासदाराच्या मुलाचा त्याच्या इन्स्टावर दोघांचा एकत्रित शेअर केलेला फोटो चर्चेचा विषय बनला आहे.
या फोटोची सोशल मीडियावर वेगळीच चर्चा रंगल्याचे पाहिला मिळत आहे. या फोटोत रिंगूसोबत असेलल्या मुलाचे नाव कृष्णराज महाडिक आहे. भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांचे ते चिरंजीव आहेत. फोटोमध्ये कृष्णराज महाडिक व रिंकू राजगुरू श्री महालक्ष्मी मंदिराबाहेर उभे असलेले दिसत आहेत.
आज अभिनेत्री रिंकू राजगुरू कोल्हापूर येथे आल्या आणि त्यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले, असे कॅप्शन या फोटोला कृष्णराज महाडिक यांनी दिले आहे. यावर फोटोच्या खाली कमेट्सचा पाऊस पडत असून अनेक मजेशीर कमेंट्स युजर्सकडून करण्यात आल्या आहेत.
…भावा सैराट झालं जी
चाहते या फोटोला लाइकही करत आहेत. साहेबांना नाहीतर आईंना पाठवा हा फोटो जरा कोणी तरी. अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर भावा विषय संपला, सैराट झालं जी…’, विचार करायला हरकत नाही, अशी कमेंट केली आहे. यामुळे रिंकू राजगुरू आणि कृष्णराज महाडिक यांच्या एकत्रित फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण प्राप्त झाले आहे. खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक हे एक युट्युबर आहेत. ते त्यांच्या युट्युब चॅनेलवरून वेगवेगळे व्हिडिओ ब्लॅाग्स शेअर करत असतात.





