श्रीरामपूर नगरपरिषदेत 14 कोटींचा घोटाळा

माजी नगराध्यक्षा ससाणेंसह 6 अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा 

श्रीरामपूर – श्रीरामपूर शहरातील गटार योजनेतील सांडपाणी प्रकल्पात सुमारे 14 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर नगरपरिषद तत्कालीन नगराध्यक्षा राजश्री ससाणे यांच्यासह तत्कालीन मुख्याधिकारी व इतर अधिकाऱ्यांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सन 2015- 16 या आर्थिक वर्षात झालेल्या या घोटाळ्यामुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये राजश्री ससाणे (तत्कालीन नगराध्यक्ष, श्रीरामपूर नगरपरिषद, रा.निरमे चौक वार्ड नं 3, श्रीरामपूर), सुमंत गणपतराव मोरे (मुख्याधिकारी, श्रीरामपूर नगरपरिषद, रा. हिंगणघाट, जि.वर्धा), संतोष महादेव खांडकर (तत्कालीन मुख्याधिकारी श्रीरामपूर नगरपरिषद), सूर्यकांत मोहन गवळी (बांधकाम अभियंता, श्रीरामपूर नगरपरिषद, श्रीरामपूर), राजेंद्र विजय सुतावणे (तत्कालीन बांधकाम अभियंता, श्रीरामपूर नगरपरिषद), ठेकेदार संस्था लक्ष्मी सिव्हील इंजिनियरींग प्रा.जि.कोल्हापूर, मे. दहासहस्त्र सोल्युशन प्रा.लि. ठाणे वेस्ट यांचा समावेश आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×