दीड लाखाचा मुद्देमाल जप्त, आठ जण ताब्यात
श्रीगोंदा – तालुक्यातील टाकळी लोणार येथील बसस्थानकाच्या पाठीमागे पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास छापा टाकत चार दुचाकी, जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा एकूण 1 लाख 57 हजार 390 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर ठिकाणी जुगार खेळणाऱ्या शब्बीर रमजान शेख, रायचंद सोनबा गलांडे (दोघे रा. टाकळी लोणार), बाळू सोन्याबापू ढवळे (रा. ढवळेवाडी, कोसेगव्हाण), भाऊसाहेब बबन शिंदे, वसंत दादा शिंदे (दोघे रा. टाकळी लोणार), देविदास गोपीचंद रोडे, धनेश्वर निवृत्ती मते, दीपक नवनाथ कानगुडे (तिघेही रा. टाकळी लोणार) या आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस कर्मचारी आदित्य बेल्हेकर यांच्या फिर्यादीवरून सदर जुगार खेळणाऱ्या आठ जणांविरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये मुंबई जुगारबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे