Top 15 News : MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन तात्पुरते स्थगित , LPG सिलिंडर महागला! आणि KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांचा अपघात , वाचा टॉप १५ बातम्या
Top 15 News : MPSC विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेत त्यांच्या प्रमुख मागण्यांवर सकारात्मक चर्चा केली.

MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन तात्पुरते स्थगित;
सरकारकडून मोठी आश्वासने
Top 15 News : MPSC विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेत त्यांच्या प्रमुख मागण्यांवर सकारात्मक चर्चा केली. सरकारच्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी 2 ऑक्टोबरला होणारे आंदोलन तात्पुरते स्थगित केले. आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांबाबत संविधानातील कलम 317 नुसार तीन महिन्यांत न्यायालयीन चौकशी करण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच पुढील तीन वर्षांच्या रिक्त पदांची भरती, गट ‘क’च्या पदांमध्ये विक्रमी वाढ आणि निवृत्त होणाऱ्या पदांवर एक वर्ष आधी भरती प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी ‘सिंगल कार्ड’ प्रणाली सुरू करण्याचेही सरकारने सांगितले.
आधारशिवाय दस्त नोंदणी नाही!
1 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात नवा नियम लागू
महाराष्ट्रात दस्त नोंदणीसाठी आता आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेला हा निर्णय 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. यासंदर्भात राज्य सरकारने राजपत्र प्रसिद्ध केले आहे. खरेदी-विक्री, बक्षीस, गहाण, वाटणी यांसह 63 प्रकारच्या दस्त नोंदणीसाठी आधार ओळखपत्र आवश्यक असेल. खोटे पक्षकार आणि साक्षीदार उभे करून होणारी फसवणूक रोखणे हा या निर्णयाचा उद्देश आहे. त्यामुळे मालमत्ता व्यवहारातील फसवणूक कमी होऊन दस्त नोंदणी प्रक्रिया अधिक पारदर्शक होण्यास मदत होईल.
शरद पवारांचा पुणे जिल्ह्यात दुष्काळ दौरा;
3 तालुक्यांना देणार भेट
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार येत्या 3 ऑक्टोबरला पुणे जिल्ह्यात दुष्काळ दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते बारामती, पुरंदर आणि दौंड या तीन तालुक्यांना भेट देणार आहेत. दौऱ्यादरम्यान पवार शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी आणि समस्यांवर चर्चा करणार आहेत. या दौऱ्यात एका सभेचेही आयोजन करण्यात आले आहे.
राज्यात परतीच्या पावसाचा जोर;
काही भागात सरी, तर उन्हाचा चटका वाढला
राज्यात परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यासह उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान, ऑक्टोबर सुरू होताच अनेक जिल्ह्यांत उन्हाचा कडाका वाढला आहे. बुधवारी मालेगावमध्ये राज्यातील सर्वाधिक 37.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर महाबळेश्वरमध्ये नीचांकी 17.7 अंश तापमान नोंदवले गेले. सांगलीच्या तासगावमध्ये 50 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील दोन-तीन दिवसांत मान्सून आणखी काही भागातून माघार घेण्याची शक्यता आहे.
दुष्काळात अधिकाऱ्यांना सुट्टी महागात पडणार;
परवानगीशिवाय रजा घेतल्यास कारवाई
सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर होत असताना प्रशासनाने अधिकारी-कर्मचाऱ्यांना कठोर निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दुष्काळाशी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी परवानगीशिवाय रजा घेऊ नये, तसेच मुख्यालय सोडू नये, असे आदेश दिले आहेत. नियम मोडल्यास निलंबनासह फौजदारी कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. महसूल, कृषी, पाणीपुरवठा, वीज, पशुसंवर्धन, मृदा व जलसंधारण, सार्वजनिक बांधकाम, सहकार आणि भूमी अभिलेख विभागांचा यामध्ये समावेश आहे. पीक पाहणी, नुकसान नोंदणी आणि शेतकऱ्यांना मदत देण्याच्या कामांना प्राधान्य देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
RNO -शेतकऱ्यांसाठी चिंतेची बातमी;
इजिप्तचा कांदा मुंबईच्या बाजारात दाखल Top 15 News :
कांद्याला चांगला भाव मिळत असताना राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभं राहिलं आहे. इजिप्तचा कांदा मुंबईतील वाशीच्या एपीएमसी बाजारात दाखल झाला आहे. राज्यातील कांद्याला सध्या 45 रुपयांहून अधिक दर मिळत असताना, इजिप्तच्या कांद्याचा दर 35 ते 40 रुपये किलो आहे. जवळपास 450 कंटेनर कांदा जेएनपीए बंदरात दाखल झाल्याची माहिती आहे. त्यापैकी दोन कंटेनर वाशी बाजारात पोहोचले आहेत. कमी दरातील कांद्याची आवक वाढल्यास स्थानिक कांद्याच्या दरावर दबाव येण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांच्या नफ्यावर परिणाम होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
RNO – संजय गायकवाडांचा श्वेता महालेंवर पलटवार;
गंभीर आरोपांमुळे बुलढाण्यात राजकीय वाद
बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड आणि भाजप आमदार श्वेता महाले यांच्यातील वाद पुन्हा चिघळला आहे. शिवसैनिकांच्या कुटुंबातील महिलांना कोणाच्या कुटुंबातून मेसेज जातात, याची चौकशी झाली पाहिजे, अशी टीका महाले यांनी केली होती. त्यावर गायकवाड यांनी पुरावे सादर करण्याचे आव्हान दिले. तसेच महाले यांच्या पतीवर काही गंभीर आरोप केले. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या काही व्यक्तींना पोलिसांकडून सोडवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. या आरोपांना महाले यांच्याकडून अद्याप काय उत्तर येते, याकडे लक्ष लागले आहे.
RNO – मराठवाड्यात पाणी नियोजनाला वेग;
ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणीसाठा टिकवण्याचा आराखडा
मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणीसाठा उपलब्ध राहील, अशा पद्धतीने नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. सध्या मराठवाड्यात केवळ १० ते १२ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, त्यात पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे नियोजन सुरू आहे. दरम्यान, २०२८ मधील प्रकल्पांसाठीही नियोजन सुरू असून, फ्लोटिंग सोलर प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
RNO – संपूर्ण महाराष्ट्राचा बिहार झालाय’;
सचिन सावंतांचा सरकारवर निशाणा
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी बुलढाण्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. भाजप आमदार श्वेता महाले यांनी ‘बुलढाण्याचा बिहार झालेला आहे’ असे म्हटल्याचा संदर्भ देत, नुसता बुलढाण्याचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा बिहार झाल्याचा दावा सावंत यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात सत्ताधारी आमदारांकडूनच सरकारच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित होत असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच सरकार गुन्हेगारांना संरक्षण देत असल्याचा आरोप करत महिला, सर्वसामान्य नागरिक आणि सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्यांच्या सुरक्षेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
RNO – दुष्काळी पीक नुकसानीचे पंचनामे सुरू;
बांधावर अधिकारी पाहून शेतकऱ्याला अश्रू अनावर
अकोला जिल्ह्यात दुष्काळामुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी चार दिवसांत पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश दिल्यानंतर मंडळ अधिकारी, तलाठी आणि कृषी विभागाचे अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून पाहणी करत आहेत. बोरगाव परिसरात नुकसानीची पाहणी सुरू असताना एका शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले. “सावकाराचं कर्ज कसं फेडायचं? मुलीचं लग्न कसं करायचं?” असा सवाल करत त्याने व्यथा मांडली. पीक हातातून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, सरसकट कर्जमाफी आणि नुकसानभरपाईची मागणी होत आहे.
LPG सिलिंडर महागला!
कमर्शियल गॅसच्या दरात मोठी वाढ Top 15 News :
गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना महागाईचा झटका बसला आहे. 1 ऑक्टोबरपासून 19 किलोच्या कमर्शियल LPG सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मुंबईत सिलिंडर 63 रुपयांनी महागून 2,767 रुपये झाला आहे, तर दिल्लीत 62.50 रुपयांच्या वाढीनंतर दर 2,810 रुपये झाला आहे. पटणामध्ये सर्वाधिक 71.50 रुपयांची वाढ झाली आहे. मात्र, 14.2 किलोच्या घरगुती LPG सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. कमर्शियल गॅस महागल्याने हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे आणि खाद्य व्यवसायांच्या खर्चावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
देशात यंदा 13 टक्के पावसाची तूट;
महाराष्ट्रात दुष्काळाचे संकट, रब्बी पेरणीवर परिणाम
देशात यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीपेक्षा 13 टक्के कमी पाऊस झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली. जून ते सप्टेंबरदरम्यान देशात 759.4 मिमी पावसाची नोंद झाली. 1901 नंतरचा हा 13 वा, तर 2001 नंतरचा चौथा सर्वात कमी पावसाचा मान्सून ठरला आहे. ईशान्य भारतात विक्रमी कमी पाऊस झाला असून, 36 पैकी 17 हवामान विभागांमध्ये पावसाची तूट आहे. महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा 18 टक्के कमी पाऊस झाला. त्यामुळे रब्बी पेरणीवर परिणाम होण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्यानेच पेरणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भारतीय वैमानिकामुळे फ्लाय दुबई विमानाचा अपघात टळला
नेत्यानाहू अन् पंतप्रधानांकडून कौतुक
दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लाय दुबईच्या विमानात हवेतच धक्कादायक प्रकार घडला. सहवैमानिकाने कॅप्टन स्मित मच्छर यांच्यावर हल्ला करून विमानावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे. गंभीर जखमी असूनही मच्छर यांनी प्रतिकार करत कॉकपिटचा दरवाजा उघडला. त्यानंतर प्रवासी आणि क्रूने हल्लेखोराला काबूत आणले. विमानाने आपत्कालीन परिस्थितीत सौदी अरेबियातील तबूक विमानतळावर सुरक्षित लँडिंग केले. या विमानात १७४ प्रवासी होते. इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेत्यानाहू यांनी कॅप्टन मच्छर यांच्या धाडसाचे कौतुक करत त्यांना ‘खरा नायक’ म्हटले. या घटनेची चौकशी सुरू आहे.
शुभमन गिलचं गुवाहाटीत विक्रमी द्विशतक;
405 धावांचं आव्हान भारताने 8 विकेट्सनी केलं पार
भारताचा कर्णधार शुभमन गिलने गुवाहाटी वनडेत वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद 233 धावांची विक्रमी खेळी करत भारताला 8 विकेट्सनी विजय मिळवून दिला. वेस्ट इंडिजने 7 बाद 405 धावा केल्या होत्या. भारताने रोहित शर्माच्या शतकासह हे आव्हान सहज पार केलं. गिलने 117 चेंडूत द्विशतक पूर्ण करत ईशान किशनचा विक्रम मोडला. त्याने 133 चेंडूत 24 चौकार आणि 8 षटकारांसह नाबाद 233 धावा केल्या. हे त्याचं वनडेमधील दुसरं द्विशतक आहे. या विजयासह भारताने मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. तिसरा सामना 3 ऑक्टोबरला होणार आहे.
KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांचा अपघात
पाय घसरून पडले; गुडघ्याला दुखापत Top 15 News :
‘कौन बनेगा करोडपती 18’च्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांचा अपघात झाला. नेहमीप्रमाणे शोची सुरुवात करताना त्यांचा पाय घसरून ते खाली पडले. या घटनेत त्यांच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली असून, उभे राहण्यास त्रास होत असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली. दुखापत गंभीर नसल्याचे सांगत बिग बींनी सुरुवातीचा संवाद बसून सादर करण्याचा निर्णय घेतला. चाहत्यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली. दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी स्पर्धक शौर्य दास यांचा खेळ पुढे सुरू ठेवला. शौर्य यांनी 25 लाख रुपयांपर्यंत मजल मारली.




