अजित पवारांच्या पक्षात अस्वस्थता 22 आमदार घरवापसीच्या तयारीत? Top 10 News: अजित पवार गटाचे 22 आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चेने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडालीय. मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरमध्ये पार पडलेल्या बैठकीत यावर सविस्तर मंथन झाले. राष्ट्रवादी काँग्रेस या महत्त्वाच्या बैठकीत केवळ राजकीय रणनीतीच नाही, तर पक्षाच्या अस्तित्वाबाबत सुरू असलेल्या अफवांवरही नेत्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. सत्ताधारी गटातील सुमारे 22 आमदार गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या संपर्कात असून ते योग्य वेळेची वाट पाहत आहेत. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची घेतलेली गुप्त भेट आणि त्यानंतर निर्माण झालेली स्थिती यामुळे अजित पवार गटात मोठी नाराजी असल्याचे समोर आलंय. शरद पवार यांनी या आमदारांबाबत बैठकीत कोणतीही थेट चर्चा केली नसली तरी, त्यांची ही शांतता एका मोठ्या राजकीय रणनीतीचा भाग असल्याचे मानले जात आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी डॉ. मनोज शिरुरेला सीबीआयकडून अटक देशभरात खळबळ उडवणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यातून आणखी एका आरोपीला सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला हा आरोपी बालरोगतज्ज्ञ असून डॉक्टर मनोज शिरुरे असं त्याच नाव आहे. मनोज शिरुरे याने शिवराज मोटेगावकरकडून स्वतःच्या मुलासाठी पेपर खरेदी केल्याचा आरोप आहे.सीबीआयने मनोज शिरुरेला लातूरहून चौकशीसाठी पुण्यात आणलं होतं. या चौकशीनंतर मनोज शिरुला सीबीआयने अटक केली. हा डॉक्टर मनोज शिरुरे मूळचा लातूरचा आहे. आतापर्यंतच्या कारवाईतील ही पहिली अटक आहे, जी एखाद्या विद्यार्थ्याच्या पालकाला झालेली आहे. तर दुसरीकडे मनीषा मांढरे ज्या मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राध्यापिका म्हणून काम पाहात होती. त्या कॉलेजमधे जाऊन सीबीआयनं तपासणी केली. याठिकाणी मांढरे यांच्या कपाट, लॉकर, डेस्क या सगळ्याची सीबीआयने तपासणी केलीय. शेतकऱ्यांसाठी 25 टक्के पेट्रोल पंप राखीव करा राष्ट्रवादी काँग्रेसचा सरकारला इशारा येत्या २४ तासात शेतकऱ्यांना २५ टक्के पेट्रोल पंप राखावी करा, अन्यथा सरकारी वाहनं फिरू देणार नाही, असा गंभीर इशारा शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीने दिला आहे. राज्यातील अनेक भागात इंधनाचा तुटवडा भासत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणच्या पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तर पेट्रोल-डिझेलचा जपून वापरा असं आवाहन करत आहेत.पेट्रोल पंपावर डिझेल मिळत नसल्याने शेतकऱ्यांना शेत जमिनी तयार करताना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. पुढील १५ दिवसात जर शेतकऱ्यांच्या जमिनी तयार होऊ शकल्या नाहीत तर पेरण्या करण्यास अडचणी निर्माण होणार असून शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळं तातडीने शेतकऱ्यांसाठी सरकारने डिझेल पंप राखीव करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली आहे. कुलकर्णीने मोटेगावकरला पुरले १३२ प्रश्न? ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक खुलासा ‘सीबीआय’च्या तपासातून समोर आलाय. मुख्य सूत्रधार शिवराज मोटेगावकरला कुलकर्णीनं तब्बल १३२ प्रश्न पुरवल्याचा उघड झालंय. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार शिवराज मोटेगावकरने केवळ पेपरच चोरला नाहीतर थेट NTAच्या मुख्य पॅनलमध्येच आपली माणसे पेरल्याचं सांगितलं जातंय. मोटेगावकरने अत्यंत हुशारीने आणि सुनियोजितपणे मोडस ऑपरेंडी राबवल्याचं सीबीआयच्या तपासात उघडकीस आलंय.प्रश्नपत्रिकेच्या भाषांतराची जबाबदारी असलेल्या प्रा. पी.व्ही. कुलकर्णीने 135 पैकी 132 प्रश्न शिवराज मोटेगावकरला पुरवले होते. या प्रश्नांची पीडीएफ मोटेगावकरकडे आधीच उपलब्ध होती. भाषांतरासाठी दिलेले तीन संच कुलकर्णीनं लीक केल्यानं परीक्षेची गोपनीयता धोक्यात आली. इतकंच नव्हे तर शिवराज मोटेगावकरने हे सगळे प्रश्न लिहून घेतले होते, असे तपासात निष्पन्न झालंय. अरबी समुद्रावर नवीन प्रणाली तयार मान्सून वारे कमकुवत होण्याची भीती Top 10 News: देशात उष्णतेची विक्रमी तीव्र लाट पसरलीय. दरम्यान, स्कायमेट या हवामान संस्थेनं अरबी समुद्रावर एक नवीन प्रणाली तयार झाल्याचा अहवाल दिलाय, ज्यामुळे मान्सूनचे वारे कमकुवत होऊ शकतात. यामुळे केरळसह दक्षिण भारतात पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. संस्थेने दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवडाभर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब, छत्तीसगड, ओडिशा, महाराष्ट्र आणि गुजरातसह 10 राज्यांमध्ये कोरडे, उष्ण वारे वाहतील. संस्थेनुसार, या काळात या राज्यांमध्ये कमाल तापमान 45°C किंवा त्याहून अधिक पोहोचेल. पश्चिमी प्रणाली कमकुवत झाल्यामुळे आणि कोणतीही सक्रिय हवामान प्रणाली नसल्यामुळे पावसाची शक्यता नसल्याचं साग्न्येत येतंय. लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज; महत्त्वाचा शासन निर्णय जारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील काही लाभार्थी महिलांना गेल्या आठवड्यात मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे मिळण्यास सुरुवात झाली होती.या योजनेच्या काही लाभार्थी महिलांना दोन्ही महिन्यांची रक्कम मिळाली नसल्याचं समोर आलं होतं. आज महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक व न्याय विभागाकडून एक शासन निर्णय जारी करण्यात आलाय. सामाजिक न्याय विभागाच्या शासन निर्णयानुसार 730 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलीय. ही रक्कम मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी करण्यात आलीय. त्यामुळं ज्यांना या दोन महिन्याचे पैसे आले नाहीत त्यांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होणार असल्याचं सांगण्यात येतंय. फेक टेलिग्राम चॅनेल्सवर कारवाईचे आदेश नीट यूजी पुनर्परीक्षेपूर्वी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना दिशाभूल करणारी माहिती पसरवणारे नेटवर्क शोधून ब्लॉक करण्याचे निर्देश देण्यात आलेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांसोबत उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. परीक्षेचे सुरक्षित, पारदर्शक आणि निष्पक्ष आयोजन सुनिश्चित करण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यावर भर देण्यात आला. बैठकीला शिक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि NTA चे महासंचालक उपस्थित होते. संभाव्य त्रुटी आधीच ओळखून प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मेटा , गुगल आणि टेलिग्राम च्या प्रतिनिधींसोबत झालेल्या स्वतंत्र बैठकीत स्पर्धा परीक्षांबाबत सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. “नेतान्याहू माझ्या इशाऱ्यावर चालणार डोनाल्ड ट्रम्प यांचा सर्वात मोठा दावा! इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील युद्ध संपण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही. त्यातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्याने नव्या चर्चेला उधाण आले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे मी सांगेन ते करतील, असेही ट्रम्प म्हणाले आहेत. नेतान्याहू खूप चांगले आहेत. मी त्यांना जे करायला सांगेन, तेच ते करतील. माझ्या मते, इस्रायलमध्ये त्यांना चांगली वागणूक मिळत नाही. सध्या इस्रायलमध्ये माझी लोकप्रियता ९९% आहे. मी पंतप्रधानपदासाठी निवडणूक लढवू शकतो. असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत. त्यांच्या या खोचक वक्तव्यानंतर जगभरातील एकच खळबळ उडाली आहे. कोलकाताचा मुंबईवर ४ गडी राखून विजय आयपीएल २०२६ च्या ६५ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सला पराभूत करून आपल्या प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या. कोलकाताने पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सला चार गडी राखून पराभूत केले. खराब फलंदाजीमुळे मुंबईवर अखेरच्या सामन्यातही पराभवाला सामोरे जाण्याची नाचक्की सहन करावी लागली. आयपीएलचा ६५ वा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळला गेला. यात केकेआरनं ४ विकेट राखत मुंबईला हरवलं. मुंबईने दिलेल्या १४८ धावांचे आव्हान कोलकाताच्या संघाने १९ षटकात ६ विकेट गमावत पार केलं.दरम्यान या विजयामुळे केकेआरच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा अजूनही जिवंत आहेत. भारती सिंगचा ९ वर्षानंतर संसार मोडणार? Top 10 News: टीव्हीवरील कॉमेडीची क्वीन भारती आणि तिचा पती हर्षचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. मात्र या आता भारती सिंगने घटस्फोटाच्या अफवांवर मोठा खुलासा केलाय. भारतीने नुकत्याच एका व्लॉगमध्ये घटस्फोटच्या चर्चा खोट्या असल्याच म्हटलंय. तसंच दोघंही आनंदाने एकत्र राहत असल्याचही तिनं सांगितलं.याविषयी बोलताना तिने “अनेक वाईट अफवा पसरत आहेत ज्या पूर्णपणे खोट्या आहेत. आम्ही दोघे कधीही वेगळे होऊ शकत नाही, कदाचित मृत्यूनंतरही नाही. भारती आणि हर्ष यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे, किंवा त्यांचे संबंध बिघडले आहेत, अशा अफवा ऐकायला लोकांना मजा येते…”असं म्हणत तिनं या चर्चा फेटाळून लावल्यात.