जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी आज मतदान Top 10 news: राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान होत आहे. यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्हा परिषदेच्या 731 तर पंचायत समित्यांच्या 1,462 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. एकूण 7,438 उमेदवार रिंगणात असून 2 कोटी 8 लाख 20 हजार 702 मतदान मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दरम्यान, आज सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान करण्यात येणार आहे. मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर संबंधित 12 जिल्ह्यांमधील शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मतदानानंतर 9 फेब्रुवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. पुण्यात मतदानाआधीत राडा पुणे, सोलापूरसह राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितीसाठी आज मतदान होणार आहे. सकाळी सात वाजताना मतदाना सुरूवात होणार आहे. पण त्याआधीच पुण्यातील खेडमध्ये मध्यरात्री प्रचंड राडा झाला. राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. आंबेठाण पाईट जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनिता बुट्टे यांच्या नवऱ्यावर अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केला. यामध्ये शरद बुट्टे पाटील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. बुट्टे पाटील यांच्यावर हल्ला झाल्याचे समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचे शेकडो लोक रस्त्यावर उतरले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली. MIM च्या नगरसेविकेची पक्षातून हकालपट्टी अमरावती महानगरपालिका मोठी घडामोड झालीय. महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीमध्ये एमआयएमच्या नगरसेविका मिराबाई कांबळे यांनी पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात जाऊन भाजपच्या महापौर उमेदवाराला आणी युवा सन्मान संघटनेच्या उपमहापौर पदाच्या उमेदवाराला मतदान केलं. कांबळे यांच्या या कृतीची गंभीर दखल घेत एमआयएम पक्षाने त्यांना तडकाफडकी पक्षातून निष्कासित करण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नाही तर मीराबाई कांबळे यांचा नगरसेवक पद रद्द करा यासाठी एमआयएमच्या वतीने अमरावती महानगरपालिका आयुक्तांना पत्र देखील देण्यात आलंय. रामदास कदमांनी राष्ट्रवादीच्या कामात नाक खुपसू नये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या निधनानंतर सुनील तटकरे यांनी गलिच्छ राजकारण केलं असल्याची टीका शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रामदास कदम यांनी केली होती.त्य्नाहचय या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या मनीषा तुपे यांनी सडेतोड उत्तर दिलंय.रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कामकाजात नाक खुपसायचे काही कारण नाही. आमचे सर्व नेते, आमदार, कोअर कमिटीने सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय एकत्रितपणे घेतला आहे, असं मनिषा तुपे म्हणाल्या.अहो बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांना तुम्ही किती त्रास दिलात हे जगजाहीर आहे. खाल्या मिठाला जागणारे तुम्ही नाही तर खाल्या ताटात विष कालावणारे तुम्ही आहात, असा हल्लाबोल मनिषा तुपेंनी केलाय. आज १२ जिल्ह्यातील शाळा राहणार बंद आज राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मतदानाला सुरुवात आली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आज महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. ज्या ठिकाणी मतदान होणार आहे त्या ठिकाणी शाळा बंद असणार आहे.पुणे जिल्ह्यातील बारामती, मावळ, मुळशी, शिरुर, हवेली, दौंड, इंदापूर, पुरंदर, भोर, वेल्हे, आंबेगाव, जुन्नर आणि खेड या तालुक्यात तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीकरिता मतदान होणार आहे. निवडणूक होत असल्याने मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी तसेच कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असलेल्या मतदारांनाही निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अखेर चंद्रपूरमध्ये गटनेत्याची निवड गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी समोर आली होती. अखेर, दिल्ली दरबारी सर्व नगरसेवकांना नेऊन हा वाद संपुष्टात आल्यानंतर अखेर नागपूरमध्ये जाऊन काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांची गटनोंदणी करण्यात आली. तर, गटनेतेपदावर राजेश अडुर यांची निवड करण्यात आली असून महापौर हा वरिष्ठांच्या आदेशानुसार ठरवला जाईल, असे त्यांनी म्हटले. तसेच, काँग्रेसची प्रक्रिया म्हणून दोन ते तीन फॉर्म आमच्या काँग्रेसचे नगरसेवकांनी भरले आहेत, ते वेळेवर मागे घेतले जातील. मात्र, महापौर कोण होईल हे आमचे नेते ठरवतील. सर्व 27 नगरसेवक एकसोबत आहेत. आता कुठलाही वाद नसल्याचं अडूरे यांनी सांगितलं. १२ वाजता खासदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या बिहारच्या राजकारणात शुक्रवारी मध्यरात्री मोठी घडामोड घडली. पूर्णियाचे अपक्ष खासदार पप्पू यादव यांना पोलिसांनी मध्यरात्री १२ वाजता अटक केली. ३१ वर्षे जुन्या प्रकरणात पाटणा पोलिसांनी पप्पू यादव यांना अटक केली. १९९५ मध्ये भाड्याने घेतलेल्या पाटण्यातील एका घरावर कब्जा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पप्पू यादव यांनी प्रथम भाड्याच्या घरात आपले कार्यालय उघडले आणि नंतर ते घर ताब्यात घेतले. या प्रकरणात घरमालकाने त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. शुक्रवारी रात्री त्यांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान, पाटणा शहराचे एसपी भानु प्रताप सिंह स्वतः पप्पू यादव यांना अटक केली. पोलिस खासदारांना घेऊन जात होते, त्यावेळी त्यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला. भारत-अमेरिका अंतरिम व्यापार करार सुरू अमेरिका आणि भारत यांनी अंतरिम व्यापार करारासाठीचा आराखडा जाहीर केला. हा करार दोन्ही देशांमधील व्यापक आणि कायमस्वरूपी द्विपक्षीय व्यापार कराराच्या दिशेने प्रगतीला गती देतो. अलिकडच्या टॅरिफ तणावादरम्यान दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध मजबूत करण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे. संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, भारत आणि अमेरिका ही आराखडा जलदगतीने अंमलात आणतील. अंतरिम करार अंतिम करण्यासाठी एकत्र काम करतील. दोन्ही देशांना समान लाभ होईल असा व्यापार करार तयार करणे हे उद्दिष्ट आहे. भारत-अमेरिका भागीदारीसाठी हा करार एक महत्त्वपूर्ण कामगिरी म्हणून वर्णन करण्यात आला आहे. युवा भारताचा ऐतिहासिक षटकार हरारेच्या मैदानावर भारताच्या अंडर-१९ संघाने इतिहासाची पुनरावृत्ती केली. आयसीसी पुरुष-19 वर्षांखालील विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडवर तब्बल 100 धावांनी दणदणीत विजय साकारत सहाव्यांदा विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरले. वैभव सूर्यवंशीच्या विक्रमी आणि वादळी 175 धावांच्या खेळीमुळे भारताने 412 धावांचा डोंगर उभा केला, ज्यापुढे इंग्लंडचा संघ पुरता कोसळला. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लिश फलंदाज अपयशी ठरले आणि संपूर्ण संघ 312 धावांत गारद झाला. या विजयासह भारताने सहाव्यांदा विश्वविजेतेपदाचा चषक उंचावून नवा इतिहास रचला आहे. दिव्या शिंदेला बिग बॉसने दाखवला बाहेरचा रस्ता बिग बॉसच्या घरात रोज एक नवीन राडा पाहायला मिळत आहे. घरात शॉकिंग घटना घडली आहे. ज्यामुळे बिग बॉसने दिव्या शिंदेला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. दिव्याला सोशल मीडियावर ‘सरकार’ या नावाने ओळखले जाते. बिग बॉसच्या घरात एका टास्क दरम्यान घरातील सदस्य एकमेकांच्या चेहऱ्यावर फुली मारताना दिसतात. तेव्हा तन्वी आणि दिव्यामध्ये मोठा वाद होतो. यानंतरही दिव्या ‘मी माफी मागणार नाही’ या मतावर ठाम होती. शेवटी तिला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला. दिव्याला शोमधून निष्कासित करण्यात आलं आहे. भाऊचा धक्का सुरू होण्यापूर्वी हा निर्णय घेण्यात आला. दिव्या तेव्हा सुद्धा कोणालाही ‘सॉरी’ न म्हणता घराबाहेर पडली.