Top 10 News : १. राजीनाम्यानंतर चाकणकरांनी स्पष्ट केली भूमिका नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे उद्भवलेल्या वादानंतर रुपाली चाकणकर यांनी अखेर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. चाकणकर म्हणाल्या की, “माझे कुटुंब वारकरी संप्रदायातील असून अध्यात्मिक श्रद्धेपोटी आम्ही खरात पती-पत्नीला गुरु मानले होते. गुरुपौर्णिमोच्यानिमित्ताने पाद्यपूजा अनेकांनी केली, तशी मी आणि माझ्या पतीनेही केली. माध्यमांकडून दाखवले जाणारे व्हिडीओ हे काही वर्षांपूर्वीचे आहेत.” खरातच्या चुकीच्या कृत्यांचे कधीही समर्थन करणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. “खरातची दुसरी बाजू आम्हाला माहित नव्हती. अनेक लोकांचे फोटो खरात सोबत आहेत, परंतु केवळ महिला म्हणून मला लक्ष्य करण्यात आले याचे वाईट वाटते,” अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. २. वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा Top 10 News राज्यात उन्हाचा कडाका कमी झाला असून, हवेत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. पुढील चार दिवस राज्यात हे पावसाळी वातावरण कायम राहणार आहे. आज दक्षिण मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, तसेच विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने ‘येलो अलर्ट’ दिला आहे. येथे ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहतील. दरम्यान, या अवकाळी पावसामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात वादळी पावसामुळे मक्याचे उभे पीक आडवे झाले आहे. आधीच वाढत्या खर्चामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर या अवकाळी पावसाने आणखी संकट ओढवले आहे. Weather update ३. राष्ट्रवादीच्या २ सदस्यांना ताब्यात घेताच भाजपची बाजी सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत खळबळजनक घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना स्थानिक गुन्हे शाखेने नाट्यमयरीत्या ताब्यात घेतले होते. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू असतानाच विकास शिंदे यांच्या तक्रारीवरून महाबळेश्वर पोलिसांनी जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई, संदीप मांडवे, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे आणि वाई पंचायत समितीचे सभापती भैय्या डोंगरे यांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. Top 10 News : याप्रकरणी सातारा पोलिसांनी तातडीची कारवाई करत देसाई आणि मांडवे यांना ताब्यात घेतले. हे दोघेही सकाळी मतदानासाठी साताऱ्यात पोहोचलेले होते. या कारवाईमुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत थेट परिणाम होऊन भाजपने बाजी मारली, तर राष्ट्रवादी आणि शिंदेसेना युतीला पराभव स्वीकारावा लागला. मात्र आम्हाला जाणीवपूर्वक मतदान प्रक्रियेपासून दूर ठेवण्यासाठी पोलिसांनी ही दडपशाही केल्याचा आरोप संबंधित सदस्यांनी केला. Rohini Khadse : आणखी काही गोष्टी बाहेर पडतील! रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर शरद पवार गटाच्या महिला नेत्याचा इशारा ४. चाकणकरांचा माज उतरला नसल्याचा वडेट्टीवारांची टीका अशोक खरात प्रकरणात राज्यभरातून संताप व्यक्त केल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत चाकणकर यांच्यावर टीका केली आहे. वडेट्टीवार म्हणाले, राज्यातील सर्वाधिक अकार्यक्षम महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला आहे. पण राजीनामा देताना त्यांचा माज उतरलेला नाही. त्यांनी स्वेछेने वैयक्तिक कारणासाठी राजीनामा देत असल्याचा उल्लेख त्यांनी पत्रात केलाय. त्यांनी अशोक खरात प्रकरणात महिलांवर, पत्रकारांवर टाकलेला दबाव या प्रकरणी पोलीस तक्रार होऊ नये म्हणून केलेले उद्योग याचा कुठलाही खेद, चूक झाली असं त्यांना वाटत नाही. राजीनामा देताना पण उपकार असल्यासारखे चाकणकर यांचे वागणे निषेधार्ह आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. ‘चाकणकर हा छोटा मासा आहे. यात अजून किती मंत्री होते कोणी या बलात्कारी बाबाला राजाश्रय दिला, वाचवण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे. खरात प्रकरण दाबण्यासाठी कोणत्या नेत्यांनी,मंत्र्यांनी फोन केले याचीही चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे, असेही वडेट्टीवारांनी सांगितले. Top 10 News : ५. पुणे शहर पोलीस भरतीची उद्या लेखी परीक्षा पुणे शहर पोलीस शिपाई भरती प्रक्रियेच्या लेखी परीक्षेचे आयोजन रविवारी (२२ मार्च) आयोजन करण्यात आले आहे. लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी प्रवेशपत्र आणि चार रंगीत छायाचित्रे (पासपोर्ट साईज) घेऊन परीक्षेच्या आधी तीन तास परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे, असे आवाहन पुणे शहर पोलिसांच्या प्रशासन विभागाने केले आहे. पुणे शहर पोलीस भरती शिपाई भरती प्रक्रिया १६ फेब्रुवारी रोजी सुरू झाली. १२ मार्चपर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. भरती प्रकियेत सहभागी झालेल्या ८८ हजार १२५ उमेदवारांची शारिरिक मोजमाप आणि मैदानी चाचणी घेण्यात आली. मैदानी चाचणी स्पर्धेत ५० टकक्यांहून जास्त गुण मिळवलेले लेखी परीक्षेस पात्र ठरले. लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या २० हजार ६९ उमेदवारांची रविवारी (२२ मार्च) सहा परीक्षा केंद्रावर सकाळी ११ वाजता लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. Rupali Chakankar ६. उत्तराखंडमध्ये ५ नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. लोक भवनात पाच आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. लोक भवनात आयोजित एका समारंभात, राज्यपाल नायब राज्यपाल गुरमित सिंह यांच्या हस्ते पाच नवीन मंत्री खजन दास, भरत सिंह चौधरी, मदन कौशिक, प्रदीप बत्रा आणि राम सिंह कैदा यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. नवीन मंत्र्यांच्या समावेशामुळे, उत्तराखंडच्या मंत्रिमंडळात आता १२ सदस्य झाले आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात आहे. नवीन मंत्र्यांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री धामी यांनी, ही टीम राज्याच्या विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी एकत्रितपणे काम करेल, असा विश्वासही व्यक्त केला. ७. बेरोजगारांना मिळणार १८ हजार रुपये भत्ता पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यात सुशिक्षित बेरोजगारांना वर्षाला १८ हजार रुपये भत्ता देण्यासह ‘दुआरे चिकित्सा’ या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली आहे. ‘दुआरे चिकित्सा’ योजनाअंतर्गत प्रत्येक ब्लॉक, शहरात आरोग्य शिबिरे आयोजित करून लोकांच्या घरापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवली जाणार आहे. ‘लक्ष्मी भंडार’ योजनेच्या रक्कमेत वाढ करण्याचे आश्वासन दिले आहे. Top 10 News : त्यानुसार सामान्य प्रवर्गातील महिलांना दरमहा १,५०० रुपये, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील महिलांना दरमहा १,७०० रुपये मिळणार आहेत. या जाहीरनाम्यातून तरुण वर्गासह महिलांना दिलासा देण्यात आला आहे. Budhwar Peth Case : ‘बाबू भाई’चा पोलिसांना चकवा! बंगाल ते ईशान्य भारत पालथे घातले, तरीही पोलीस रिकाम्या हाती ८. अमेरिका इराण युद्ध थांबणार? डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठं विधान इरण, इस्त्रायल आणि अमेरिकेतील युद्ध अधिकच भडकत असल्याचे दिसत आहे. या युद्धाचा जगभरात परिणाम झाल्याचे दिसत आहे. होर्मुज सामुद्रधुनी बंद असल्याने तेलाची निर्यात आणि आखात थांबली आहे. रिफायनरी आणि गॅस प्र्कल्पांवरही मोठे हल्ले होताना दिसत आहेत. यामुळे अनेक देशात कच्चे तेल आणि गॅसचा तुटवडा आहे. जागतिक बाजारात तेलाच्या किमती गगणाला पोहोचल्या आहेत. तेलाच्या किमतीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले. जगभरातून हे युद्ध थांबवण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. यादरम्यानच आता युद्ध थांबवण्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे विधान केले. ‘मला वाटते की, आता युद्ध संपले पाहिजे. इराण देखील हे युद्ध संपवण्याचा विचार करत आहे. अमेरिका आपली उद्दिष्ट्ये साध्य करण्याच्या खूप जवळ नक्कीच पोहोचली आहे. अमेरिका इराण युद्धातील आपली लष्करी कारवाई कमी करण्याचा विचार करत आहे,’ असे मोठे विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. ९. प्रसिद्ध उद्योगपतीचा अपघात; रुग्णालयात उपचार सुरू भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आणि रेमंड ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर गौतम सिंघानिया हे मालदिवमध्ये एका अपघातात किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर त्यांना तातडीने मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयात त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू करण्यात आले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, मालदीवमध्ये स्पीडबोट उलटल्यामुळे झालेल्या अपघातात सिंघानिया जखमी झाले आहे. मात्र सध्या गौतम सिंघानिया यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. गौतम सिंघानिया हे रेमंड लिमिटेडचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. व्यवसायाव्यतिरिक्त ते कार रेसिंग, एव्हिएशन आणि लक्झरी जीवनशैलीसाठीही ओळखले जातात. 2000 साली त्यांनी रेमंड ग्रुपची जबाबदारी स्वीकारली. तसेच भारतातील टेक्सटाइल उद्योगाला मोठी ओळख मिळवून दिली आहे. १०. बंदी असूनही पाकिस्तानी पाहतायत ‘धुरंधर २’ पाकिस्तानमध्ये सध्या भारतीय चित्रपटांच्या प्रदर्शनावर अधिकृतपणे बंदी आहे. विशेषतः ‘धुरंधर २’ हा चित्रपट पाकिस्तानातील दहशतवादावर आधारित असल्याने तिथे हा सिनेमा रिलीज झाला नाही. मात्र, असं असूनही पाकिस्तानमधील लोक गुपचुपरित्या या चित्रपटाचे ‘पायरेटेड व्हर्जन’ डाऊनलोड करून पाहत असल्याचे समोर आले आहे. ट्विटरवर एका पाकिस्तानी पत्रकाराचे ट्विट व्हायरल झालं आहे. यात म्हटले आहे की, “हे अत्यंत दुर्दैवी आहे की चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दिवशीच त्याचे पायरेटेड व्हर्जन पाकिस्तानमध्ये पोहोचले आहे. पाकिस्तानी लोक भारतीय सिनेमाशिवाय राहू शकत नाहीत, मग तो चित्रपट पाकिस्तानशी संबंधित दहशतवादावर आधारित असला तरीही ही माणसं तो सिनेमा पाहितील.” हेही वाचा: Wanawadi Murder Case : अपघात नव्हे, अमानुष छळ करून ‘खूनच’! वानवडीतील ‘त्या’ मृत्यूचे धक्कादायक वास्तव समोर