टॉम क्रूझ करतो आहे “मिशन इंपॉसिबल 8’ची तयारी

टॉम क्रूझ नेहमीच खतरनाक स्टंट आणि दमदार ऍक्शन सीनसाठी प्रसिद्ध असतो. वयाची पन्नाशी ओलांडली तरी तो पंचविशीतील ऍक्शन हिरोला लाजवेल असे स्टंट करत असतो. सतत काही तरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असलेल्या टॉम क्रूझने आता “मिशन इंपॉसिबल 8′ चा तयारी सुरू केली आहे.
यासाठी तो दुसऱ्या महायुद्धात वापलेल्या एक विमान चालवण्याची प्रॅक्टिस करतो आहे. टॉम क्रूझने अलीकडेच ब्रिटनमधील केंब्रिजशायर भागात दुसऱ्या महायुद्धात वापरलेल्या 1943 सालच्या बोईड स्टीअरमॅन मॉडेल 75 हे विमान उडवण्याची प्रॅक्टिस केली होती. “मिशन इंपॉसिबल 8’च्या ऍक्शन सीनमध्ये लढाऊ विमान स्वतः टॉम क्रूझ चालवणार आहे.
त्याला शत्रूच्या काही घुसखोर विमानांचा पाठलाग करण्याचा सीन करायचा आहे. त्याची तयारी तो सध्या करतो आहे. “मिशन इंपॉसिबल’च्या सर्व भागांमधील टॉम क्रूझची ऍक्शन सर्वांना आवडली आहे.
आता “टॉप गन मेवारिक’ या आपल्या आणखीन एका अगामी सिनेमातही तो स्वतः विमान चालवणार आहे. “मिशन इंपॉसिबल’च्या निमित्ताने घेतलेल्या ट्रेनिंगचा त्याला असाही फायदा होणार आहे.





