पुणे | कोक़णात जाणाऱ्यांच्या वाहनांना टोल माफी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – गणेशोत्सवासाठी कोक़णात जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना टोल माफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. दि.5 ते 19 सप्टेंबर 2024 या कालावधीत मुंबई -बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग (रा.म. 48), मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्ग (रा.म. 66) आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील कोंकणात जाणार्या भाविकांना तसेच एसटी बसेसना टोल माफीची सवलत मिळणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार सार्वजनिक बांधकाम उपसचिव सचिन चिवटे यांनी हा शासन निर्णय जारी केला आहे.
ग्रामीण व शहरी पोलीस, आरटीओ आॉफिस यांच्यामार्फत दिले जाणाऱ्या पासेसची संख्या एकत्रित माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय मुंबई यांना माहितसाठी सादर करणाच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.
या ठिकाणी मिळणार पासेस
गणेशोत्सव 2024 कोकण दर्शन अशा आशयाचे स्टीकर्स असलेले टोल माफी पासेस त्यावर गाडी क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर नमूद असणार आहे.
परिवहन विभाग, वाहतूक विभाग, पोलीस स्टेशन, आरटीओ आॉफिस यांने समन्वय साधून पोलीस स्टेशन वाहतूक पोलीस चौकी, आरटीओ आॉफिसेस मध्ये उपलब्ध करून देण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.





