Toll Update: आजपासून प्रवास महागला! टोलच्या दरात मोठी वाढ, किती पैसे मोजावे लागणार?
Toll Update: आता फास्टॅग किंवा ऑनलाइन यूपीआयद्वारेच टोल भरावा लागणार आहे.

Toll Update: राज्यात आजपासून महामार्ग आणि एक्सप्रेसवेवरील टोल दरात सरासरी ३ ते ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एनएचएआय (NHAI) च्या राज्यातील सुमारे ७० आणि एमएसआरडीसी (MSRDC) च्या ३५ प्रमुख टोलनाक्यांवर ही दरवाढ लागू आहे.
त्याचबरोबर सर्व टोलनाक्यांवर कॅशलेस वसुली अनिवार्य करण्यात येणार असल्याने वाहनचालकांना फास्टॅग किंवा ‘यूपीआय’द्वारेच टोल भरावा लागणार आहे. तसेच फास्टॅग वैध नसेल तर संबंधित वाहनचालकाला दुप्पट टोल भरावा लागणार आहे.
तसेच ‘यूपीआय’द्वारे पेमेंट केल्यास सव्वापट रक्कम आकारली जाणार आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना नेहमी तुम्ही तुमचा फास्टॅग बॅलेन्स चेक करा. जर तुमच्या फास्टॅगमध्ये पुरेसा बॅलेन्स नसेल तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. याआधीही याबाबत नियम जारी केले होते. मात्र, आज १ एप्रिलपासून हे नियम आणखी कठोर करण्यात आले आहेत.
पुणे जिल्ह्यातील तीन राष्ट्रीय महामार्ग Toll Update
पुणे जिल्ह्यातून एकूण तीन राष्ट्रीय महामार्ग जातात. यामध्ये पुणे-कोल्हापूर, पुणे-सोलापूर आणि पुणे-नाशिक, पुणे-मुंबई एक्सप्रेसवे या महामार्गाचा समावेश आहे.
नव्या दरानुसार किती पैसे मोजावे लागणार? Toll Update
कार, जीप आणि हलक्या वाहनांपासून ते अवजड ट्रकपर्यंत सर्वांसाठीच टोलचे दर वाढले आहेत. सुधारित दरांनुसार, कार किंवा जीपसाठी आता एकेरी प्रवासाला ९५ रुपये तर परतीच्या प्रवासासाठी १३० रुपये मोजावे लागणार आहेत.
हलक्या व्यावसायिक वाहनांसाठी एकेरी दर १५० रुपये आणि परतीचा २१० रुपये असेल. बस आणि ट्रकसाठी आता ३१५ रुपये मोजावे लागतील, तर मोठ्या अवजड वाहनांसाठी तब्बल ५४५ ते ८१५ रुपये द्यावे लागणार आहे.
दरम्यान, या सर्व महामार्गावरील टोलनाक्यांवर नव्या दरांची अंमलबजावणी दि. १ एप्रिलपासून होणार आहे. वाढत्या महागाईच्या काळात टोलमधील या वाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे.
हेही वाचा:






