#Tokyo2020 : काउंटडाऊन सोहळा गुरुवारी होणार

टोकियो :- जपानमध्ये टोकियो ऑलिम्पिक यंदा होणार होते. ते एक वर्ष पुढे ढकलण्यात आले असले तरीही येत्या गुरुवारी स्पर्धेचा स्वागत सोहळा (काउंटडाऊन) होणार असल्याची माहिती जपान ऑलिम्पिक संघटना व आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने दिली आहे.
मूळ वेळापत्रकानुसार ही स्पर्धा यंदा 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत होणार होती. मात्र, करोनाचा धोका वाढल्याने स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलण्यात आली आहे. नव्या वेळापत्रकानुसार आता ही स्पर्धा पुढील वर्षी 23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. त्यामुळे येत्या गुरुवारी स्पर्धेचा स्वागत सोहळा (काउंटडाऊन) आयोजित करण्यात येणार आहे.
या सोहळ्याला निवडक सदस्य उपस्थित राहणार आहेत. मूळ निश्चिती केल्यानुसार स्पर्धेची ठिकाणे व लढतींचे वेळापत्रक कायम राहणार आहे. येत्या गुरुवारी होत असलेल्या सोहळ्यात काउंटडाऊन सुरू होणार आहे.
सुरुवात हॉकीने…
भारतीय संघाच्या खेळाडूंच्या स्पर्धांना हॉकी स्पर्धेने सुरुवात होणार आहे. भारताच्या पुरुष संघाचा सलामीचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. त्यानंतर विविध क्रीडा प्रकारांच्या स्पर्धांना प्रारंभ होईल.





