Tokyo Olympics : ओसाकाचा धक्कादायक पराभव
Updated On:

टोकियो – ऑलिम्पिक स्पर्धेतील टेनिसमध्ये महिला एकेरीत जागतिक अव्वल मानांकित जपानची नाअमी ओसाका हिला पराभवाचा धक्का बसला. हा या स्पर्धेतील सर्वात सनसनाटी निकाल ठरला.
महिला एकेरी टेनिसमधील सुवर्णपदकाची दावेदार मानल्या जात असलेल्या ओसाकाला जागतिक क्रमवारीत 41 व्या स्थानावर असलेल्या चेक प्रजासत्ताकच्या मार्केटा वोन्ड्रासोवाने 6-1, 6-4 असे पराभूत केले.
मार्केटा वोन्ड्रासोवाने दोन महिन्याचा ब्रेक घेतलेल्या ओसाकावर दडपण टाकत हा सामना जिंकला. आसोकाप्रमाणेच ऑस्ट्रेलियाच्या ऍश्ले बार्टीलाही पराभवाचा धक्का बसला.
बार्टीला जागतिक क्रमवारीतील 48 व्या स्थानावर असलेल्या स्पेनच्या नवोदित सारा सोरिबेज टोरमाकडून पराभव पत्करावा लागला.





