Tokyo Olympics : भालाफेकीत अन्नू राणीला अपयश
Updated On:

टोकियो – मंगळवारच्या स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंचा प्रारंभ निराशाजनक झाला. भालाफेकीतील अग्रगण्य खेळाडू अन्नू राणी अंतिम फेरीही गाठू शकली नाही.
कुस्तीची सुरुवातही पराभवानेच झाली. नवोदित खेळाडू सोनम मलिकला पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागला.
वास्तविक तिला पहिल्याच फेरीत अपयशाचा सामना करावा लागला. महिलांच्या फ्रीस्टाइल 62 किलो वजनी गटात तिला मंगोलियाच्या बोलोरतुया खुरेलखूकडून पराभव स्वीकारावा लागला.





