Asim Sarode : आज कॅाकरोच जनता पार्टीचं आंदोलन; पुण्यातील वकिलाची पोस्ट चर्चेत, म्हणाले “शिक्षणमंत्री बदलून सुरुवात होईल पण…”
Asim Sarode : आंदोलनाला सुरुवात होण्यापूर्वी पुण्यातील वकील अॅड. असीम सरोदे यांनी एक्सवरुन ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त करत कळीचा मुद्दा छेडला आहे.

Asim Sarode : आज दिल्लीतील जंतर मंतर येथे कॅाकरोच जनता पार्टीच्या वतीने आंदोलन पुकरण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त आंदोलन स्थळी तैनात करण्यात आला आहे. या पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके अमेरिकेहून दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांच्या आंदोलनाला परवानगी देण्यात आली आहे. (Asim Sarode )
अशातच आंदोलनाला सुरुवात होण्यापूर्वी पुण्यातील वकील अॅड. असीम सरोदे यांनी एक्सवरुन ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त करत कळीचा मुद्दा छेडला आहे. शिक्षणमंत्री बदलून सुरुवात होईल पण दृष्टीकोन कसा बदलणार? असा सवाल ट्वीटमधून सरोदे यांनी विचारला आहे. त्यांच्या या ट्वीटवर विविध कमेंटदेखील आल्या आहेत.
असीम सरोदे यांचं ट्वीट (Asim Sarode)
देशात काहीतरी बिघडलंय. देश चालविणारे व त्यांची प्रवृत्ती यांचा हिशोब झाला पाहिजे. वेदांत श्रीवास्तवा, सार्थक सिद्धांत, रायलेन अनिल,निसर्ग अधिकारी या विद्यार्थ्यांनी देशातील स्पर्धा व पात्रता परीक्षांचे ऑडिट करून परीक्षांबाबतीतील अव्यस्थापन उघड केले. आता अभिजीत दिपके आणि त्याची कॉक्रोच जनता पार्टी टीम सरकार करीत असलेल्या शैक्षणिक दुर्लक्षितपणावर पुढील प्रहार करणार. ‘ बदलो बदलो आज की शिक्षा, नही तो मांगनी होगी भिक्षा ‘ अशा घोषणा देत आम्ही मोठे झालो पण आज शिक्षणाची अधिकच दुरावस्था करून ठेवली आहे. शिक्षणमंत्री बदलून सुरुवात होईल पण दृष्टीकोन कसा बदलणार? कॉक्रोच जनता पार्टीच्या आजच्या आंदोलनात सहभागी होणाऱ्या सगळ्यांचे अभिनंदन. अहिंसक व लोकशाही मार्ग सोडू नका. आंदोलनात घुसखोरी करणाऱ्यांपासून सावध रहा, असे आवाहनही असीम सरोदे यांनी केले आहे.
देशात काहीतरी बिघडलंय. देश चालविणारे व त्यांची प्रवृत्ती यांचा हिशोब झाला पाहिजे.
वेदांत श्रीवास्तवा, सार्थक सिद्धांत, रायलेन अनिल,निसर्ग अधिकारी या विद्यार्थ्यांनी देशातील स्पर्धा व पात्रता परीक्षांचे ऑडिट करून परीक्षांबाबतीतील अव्यस्थापन उघड केले.आता @abhijeet_dipke आणि त्याची…— Asim Sarode (@AsimSarode) June 6, 2026
कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने जंतरमंतरवर आंदोलनाद्वारे भारतात नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येणार आहे.
दरम्यान, दीपके यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील घराजवळ पोलीस बंदोबस्त कायम आहे. अभिजीत दिपके यांच्या व्हॉट्सअपवर धमकीचा मेसेज आल्यापासून आई वडीलांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. (Asim Sarode )




